
बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाची गेल्या बारा वर्षापासून अतूट नाते निर्माण करणा-या गुड इव्हिनिंग सिटीने आपल्या सामाजिक आणि सकारात्मक पत्रकारितेची १२ वर्ष पूर्ण केली आहेत. त्यानिमित्ताने येथील एडेड हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित तपपूर्ती वर्धापनदिन समारोहात गुड इव्हीनिंग सिटीच्या तपपूर्ती वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशक आमदार धीरज भाऊ लिंगाडे, शेतकरी नेते रविकांत तुपकर, अॅड. जितेंद्र कोठारी, आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र वाघ, एआरडीचे संचालक राजेशजी देशलहरा, प्रवीण गीते, अजयसिंग राजपूत, महाराष्ट्राचा लाडका गायक ऋषिकेश रिकामे, गुड इव्हिकिंग सिटीचे प्रकाश्चक रणजितसिंग राजपूत, संपादक अॅड. हरिदास उंबरकर, प्रा. निशिकांत ढवळे, उपसंपादक अजय काकडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी गुड इव्हिनिंग सिटीवर प्रेम करणान्या बुलढाववेकरांची भरगच्च उपस्थिती होती.