spot_img

शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी करण्याचे प्रशासनाचे आवाहन

बुलढाणा, १९ जून (गुड इव्हिनिंग सिटी) : शासन निर्णय दिनांक २८ फेब्रुवारी, २०२३ नुसार ए.पी.एल. शेतकरी शिधापत्रिका धारकांना धान्याऐवजी थेट रक्कम त्यांचय बँक खाती जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुलढाणा जिल्यात ६५४०८ शिधापत्रिका असुन २५०५०६ एवढे लाभार्थी आहेत. आज रोजी ३५४९५ शिधापत्रिकाधारकांनी डी.बी.टी. बाबत त्यांचे अर्ज जमा केले असून त्यापैकी ३३१२८ शिधापत्रिकाधारकांना डी.बी.टी. अंतर्गत रक्कमेचे (जाने २०२३ ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत एकुण ७ कोटी) वाटप करण्यात आले. २९९१३ ए.पी.एल. शिधापत्रिका धारकांनी अदयाप पर्यंत त्यांचे अर्ज जमा केलेले नाहीत. तरी त्यांना आवाहन करण्यात येते की, तात्काळ जवळच्या रास्त भाव दुकानदाराकडे अर्ज जमा करुन दयावे. जेणे करुन त्यांना रोक रक्कमेचा लाभ देता येईल. शासन पत्र दिनांक १ जून २०२४ नुसार रास्त भाव दुकानात लाभार्थ्यांनी e-kyc करण्याच्या सुचना प्राप्त आहेत. बुलढाणा जिल्हयात एकुण १३ तालुक्यांमध्ये एकुण शिधापत्रिका ४४६९८३ शिधापत्रिका असुन १८५७२८२ लाभार्थी आहेत. आज रोजी ५९९१४ एवढया लाभार्थ्यांची e-kycपुर्ण झाली असुन १७९७३६८ एवढे लाभार्थी e-kyc करणे बाकी आहे. व त्याचप्रमाणे मोबाईल सिडिंग देखील गरजेचे असुन एकुण शिधापत्रिका ४४६९८३ पैकी ३३९४७३ एवढे मोबाईल सिडिंग झाले असुन १०६८५० एवढे शिधापत्रिकांची मोबाईल सिडिंग बाकी आहे. शासन पत्र दिनांक २७ मे २०२४ नुसार ई- श्रम पोर्टल वरील नोंदणीकृत, स्थलांतरीत कामगारांना रेशन कार्ड दिलेले नसेल त्यांना त्वरीत शिधापत्रिका देणेबाबत सुचीत केले आहे. बुलढाणा जिल्हयात एकुण १३ तालुक्यांमध्ये २१६८४ एवढया कामगारांना शिधापत्रिका नसल्याचे निर्देशात आले असुन संबंधीत कामगारांनी तहसिल कार्यालयात शिधापत्रिकेसाठी अर्ज करावा. करीता सर्वांना आवाहन करण्यात येते की, तात्काळ जवळच्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे आपले e-kyc व मोबाईल सिडिंग पुर्ण करुन घ्यावे. दुकानाची वेळ सकाळी ८ ते १२ व सायंकाळी ४ ते ८ ही आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत