भुमिहीन होण्यापासून वाचवा शेतकऱ्यांची शासनाला आर्त हाक
बुलढाणा, २० जून (गुड इव्हिनिंग सिटी) : सिंदखेडराजा ते शेगाव हा भक्तीमार्ग तात्कळ रद्द करण्याची मागणी आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. या भक्तीमार्गासाठी जमिन अधिग्रहीत करण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक होत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आपली भुमिका मांडली. शेतकऱ्यांसोबत माजी जि.प. सदस्य डॉ. ज्यांतीताई खेडेकर यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांना भुमिहीन होण्यापासून वाचवा अशी मागणी केली आहे. निवदेनात म्हटले आहे की, सिंदखेड राजा ते शेगाव या नविन भक्तीमार्गामध्ये आमच्या मालकीची शेतजमीन अधिग्रहीत करण्याचे अधिसूचना निघाल्याने आम्ही भयग्रस्त झालो आहोत. सदर भक्तीमार्गासाठी आमच्या जमीनी घेवुन आम्हाला भूमीहीन किवा अल्पभूधारक करण्यात येवु नये या राज्य महामार्गामध्ये सिदखेडराजा ते शेगाव मधील सर्व गावातील बाधीत शेतकऱ्यांच्या पिकाऊ व काळ्या कसदार जमीनी जात आहे. आधीच आम्ही अल्पभुधारक शेतकरी असून काही शेतकऱ्यावर भूमीहीन होवुन त्यांचे कुटुंब रस्त्यावर येणार आहे. भविष्यातील उदरनिर्वाहाचे साधन संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आम्ही भयग्रस्त झालो आहे. सदर महामार्गासाठी आमचे पिकाऊ जमीनी अधिग्रहीत करण्यास आम्हा सर्व शेतकऱ्यांना तिव्र विरोध आहे. तरी शासन आणि प्रशासनाच्या वतीने आमच्या उपजिवीकेचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा. आमच्या परिसरातून सिदखेडराजा ते शेगाव येथे जाणारे अनेक पर्यायी राजमार्ग उपलब्ध आहेत. देऊळगावराजा चिखली शेगाव, दुसरबीड सा. खेडा, शेगाव मेहकर येथील समृध्दीच्या रिंग रोड जवळून जाणारा मेहकर जानेफळ शेगाव उपलब्ध आहे. कोणीही हया महामार्गाची मागणी केलेली नाही. मुंबई किंवा दूरवरच्या लोकांना शेगाव ला जाण्यासाठी रेल्वे व इतर ही मार्ग आहेत. हा महामार्ग रद्द न झाल्यास आम्हाला नाईलाजास्तव तिव्र स्वरुपाचे आंदोलन करावे लागेल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहोल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी माजी जि.प.सदस्य डॉ. ज्योतीताई खेडेकर, गांगलगावचे सरंपच नितीन म्हस्के व गांगलगाव, पांढरदेव, करतवाडी. एकलारा, अंबाशी, मानमोड, घाणमोड, कवठळ, अंढेरा, अंत्री खेडेकर येथील शेतकऱ्यांची मोठ्यां संख्येने उपस्थिती होती.