अभ्यासाच्या तणावामुळे डिप्रेशनमध्ये होती ?
बुलढाणा, 23 जून (गुड इव्हिनिंग सिटी) ः येथील मच्छी ले-आऊट मध्ये राहणार्या एका विद्यार्थिनीने गळफास लावून घेवून आत्महत्या केली. आज दुपारच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. जेवायची वेळ झाली तरी जोहना तब्बसुम (17) येत का नाही ? म्हणून तिचे वडील रियाज सैय्यद तिच्या खोलीजवळ गेले असता, दरवाजा आतून बंद होता. आवाज देवूनही उघडला नाही, म्हणून त्यांनी दरवाजा तोडला, तर त्यांना त्यांची मुलगी जोहना फासावर लटकलेली दिसली. दुपट्ट्याच्या सहाय्याने तिने स्वतःला फास लावून घेतला होता. जोहना नीटची परीक्षा रिपीट केल्यानंतर सुद्धा तिला कमी मार्क्स मिळाल्यामुळे ती भयंकर डिप्रेशन मध्ये असल्याची माहिती आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीला अभ्यासाचे टेंशन होते. मागील काही दिवसांपासून ती प्रचंड तणावात होती. या तणावातूनच तिने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज आहे. तिचे वडील देऊळघाट येथे शिक्षक आहेत. मूळचे भोकरदनचे असलेले हे कुटूंब शहरातील मच्छी ले-आऊट भागात राहात होते.