spot_img

विधान परिषद निवडणुकीत अॅड. काझी यांना संधी द्यावी

बुलढाणा, २३ जून (गुड इव्हिनिंग सिटी): राज्यात पुढील महिन्यात होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दोन जागा देण्यात आल्या असून त्यातील एका जागेवर पक्षाने राष्ट्रवादीचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांना संधी द्याव, यासाठी पक्षाकडे मागणी रेटून धरणार असल्याची माहिती माजी मंत्री, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. नाझोर काझी हे यांनी पक्ष संघटनेत गेल्या अनेक वर्षांपासून काम केले आहे. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल असले तरी त्यांचा आता प्रभाव विदर्भात दिसून येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे विदर्भात पक्षाविस्तार होणे महत्वाचे आहे. त्या दृष्टीने जर पावले उचलायची असली तर प्रतिनिधीत्व देणे आवश्यक आहे. तसेच मुस्लिम समाज सुध्दा या लोसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पासून दूर गेल आहे. त्यामुळे कुठेतरी पुन्हा मुस्लिम मतदारा आपल्याकडे परत आणायचा असेल तर मुस्लिम समाजाला प्रतिनिधीत्व देणे आवश्यक आहे. या संदर्भात बोलताना डॉ. शिंगणे म्हणाले की, काझी यांना या जागेवर सदस्य म्हणून नियुक्त करण्यासाठी यापूर्वी देखील मागणी करण्यात आली होती. मात्र, काही कारणांनी पक्षाने अन्य सदस्यांनी येथे नियुक्ती दिली. आता पुन्हा एकदा पक्षाकडे हा विषय रेटून धरणार असून काझी यांच्यासारख्या कार्यकर्त्याला ही संधी मिळावी, यासाठी वरिष्ठांना भेटणार असल्याचे डॉ. शिंगणे यांनी सांगितले. दरम्यान, अॅड. नाझेर काझी हे गेल्या दहा वर्षांपासून जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, सिंदखेडराजा नगरीचे नगराध्यक्ष राहिलेल्या काझी यांनी पक्षात अनेक पदांवर काम केले आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील त्यांचा संपर्क, पक्षातील संपर्क या जमेच्या बाजू आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचे उमेदवार विजयी व्हावे, यासाठी तन, मनाने काम करून विजयात राष्ट्रवादी पक्ष मागे नाही, हे दाखविले. यापूर्वी २०२२ मध्ये त्यांनी पक्षाकडे या नियुक्तीसाठी मागणी केली आहे. पक्ष नेमकी त्यांच्या नियुक्ती बाबत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत