बुलढाणा, २६ जून (गुड इव्हिनिंग सिटी) : भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. १ जुलै २०२४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होणारे आणि अद्याप मतदार नोंदणी केलेली नसलेल्या युवाना मतदार नोंदणीची संधी प्राप्त होणार आहे. त्यानुसार नागरिकांनी मतदार नोंदणी अर्ज ऑनलाईन स्वरूपात vot- ers.eci.gov.in आणि वोटर हेल्पलाईन अॅपचा उपयोग करून सादर करावा. ऑफलाईन स्वरूपात संबंधित बीएलओ आणि संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करता येईल. यासाठी अर्ज आणि लिंक मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in आणि buld- hana.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. वोटर हेल्पलाईन अॅपद्वारे अथवा टोल फ्री क्रमांक १९५० वर मतदारांनी मतदारयादीत आपले नाव असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. तसेच नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या महिला, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाणार आहे. २५ जून २०२४ ते २४ जुलै २०२४ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत बीएलओ घरी येणार असून याआधी अनावधनाने मतदारयादीतून नावाची वगळणो झाली असल्यास बीएलओ यांच्याकडे किंवा ऑनलाईन स्वरूपात नमुना ६ भरून मतदार नोंदणी करता येणार आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार मंगळवार, दि. २५ जून ते बुधवार, दि. २४ जुलै २०२४ पर्यंत पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी, मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण, मतदारयादी, मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, अस्पष्ट, अंधुक छायाचित्र बदलून त्याऐवजी मतदाराकडून योग्य छायाचित्र प्राप्त करून मतदारयादीत सुधारणा करणे, तसेच विभाग, भाग यांची नव्याने रचना, मतदानकेंद्राच्या सीमांची पुनर्रचना, मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे, नमुना १ ते ८ तयार करणे, १ जुलै २०२४ अर्हता दिनांकावर आधारीत एकत्रित प्रारूप यादी तयार करण्यात येणार आहे. पुनरिक्षण कार्यक्रमात गुरुवार, २५ जुलै २०२४ रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करणे, गुरूवार, दि. २५ जुलै २०२४ ते शुक्रवार, ९ ऑगस्ट २०२४ दरम्यान दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी राहणार आहे. दावे व हरकतो स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेले शनिवार व रविवार रोजो विशेष मोहिमांचा कालावधी राहणार आहे. सोमवार, १९ ऑगस्ट २०२४ पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येणार आहे. मंगळवार, २० ऑगस्ट २०२४ रोजी मतदारयादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. २५ जुलै २०२४ रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व विधानसभा मतदारसंघ व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या स्तरावर प्राप्त दावे आणि हरकतो स्विकारून निकाली काढल्यानंतर अंतिम मतदारयादी २० ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरीकांना मतदार नोंदणीसंदर्भात येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र टोल फ्री क्रमांक १९५० कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच वोटर हेल्पलाईन अॅपद्वारे मतदार यादोत नाव तपासावे व नाव नसल्यास तात्काळ त्या अॅपद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीमध्ये नागरिकांनी मतदार नोंदणी करण्यासाठी संबंधित तहसिल कार्यालय, बीएलओ यांच्या सोवत संपर्क साधून आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट असल्याची मतदारांनी खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.