अध्यक्षपदी डॉ.शोंन चिंचोले; कार्याध्यक्ष सुनील सपकाळ
बुलढाणा, ३० जून (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा शहर साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ शहर मानले जाते. शहराची सामाजिक एकता जोपासत विविध क्षेत्रांमध्ये रचनात्मक कार्य करता यावे यासाठी लोकविचार धारेला प्राधान्य देणाऱ्या ‘लोकमंच बुलढाणा’ या फोरमची स्थापना करण्यात आली आहे. याचे अध्यक्षपदी प्रख्यात सर्जन व सामाजीक कार्यात अग्रेसर डॉक्टर शोण चिंचोले यांची तर कार्याध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते सुनील सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत निवड समितीची बैठक नुकतीच चिंचोले चौक येथे पार पडली. बैठकीचे अध्यक्ष स्थानी जिल्हा केंद्रीय बँकेचे सीईओ डॉ. अशोकराव खरात होते. यावेळी बुलढाणा शहरामध्ये सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरिव काम करता यावे यासाठी सर्वसमावेशक ‘लोकमंच बुलढाणा’ या फोरमची स्थापना करण्याचा ठराव पत्रकार गणेश निकम यांनी यावेळी मांडला. त्याला उपस्थितांनी प्रतिसाद दिला. यावेळी कार्यकारणी गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष डॉ. शोन चिंचोले, कार्याध्यक्ष – सुनील सपकाळ, उपाध्यक्ष सुनील शेळके, उपाध्यक्ष सुरेश साबळे, सचिव प्रा. शाहिणाताई पठाण, सहसचिव अमोल रिंढे, कोषाध्यक्ष अॅड- जयसिंगराजे देशमुख, मार्गदर्शक डॉ. अशोकराव खरात, दामोदरकाका बिडवे, संयोजक पत्रकार गणेश निकम, संजय खांडवे, प्रसिद्धी प्रमुख संदीप वानखेडे, सदस्य सुनील जवंजाळ, इजी. सुरेश चौधरी, सुजित देशमुख, डॉ. किंनगे, पत्रकार दिनेश मुडे, कैलाश हरिभाउ रावुत, गणेश उभरहंडे, सोहम घाडगे, शोकत शहा, मिलिंद वानखेडे, रविकिरण टाकळकर, पंजाबराव गायकवाड, गजेंद्र राजपूत, विजयाताई काकडे यांची निवड करण्यात आली. जात धर्म पक्ष विरहित शहराच्या सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक शेत्रात कार्य, महापुरुष जयंत्या, गुणवंतांचा गुणगौरव तर ज्येष्ठांचा आदर सन्मान, पर्यावरण संरक्षन जनजागृती आदी उद्देशाने ‘लोकमंच बुलडाणा’ कार्य करणार आहे. सुनील सपकाळ गेल्या दोन दशकांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. विविध सामाजिक चळवळीला त्यांनी बळ दिले आहे. तर आपला डॉक्टरी पेशा सांभाळून डॉ. शोन चिंचोले यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून समजिक कार्यात आगळावेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.