spot_img

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत सुधारणा

बुलढाणा, ३ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : महाराष्ट्र सरकारने २८ जून रोजी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीत पवार यांनी अर्थसंकल्प सादर करतांना केली. या योजने अंतर्गत महिलांना १ हजार ५०० रूपये प्रती महिना मिळणार आहे. या योजनेसाठी नोंदणी करण्याची सुरूवात १ जुलै पासून सुरू झाली आहे. या योजनेसाठी काही कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार असल्यामुळे अनेकांची कागपत्रे जमा करण्यासाठी धावपळ सुरू आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या महत्वाच्या कागदपत्रांमध्ये अधिवास प्रमाणपत्र व तहसीलदारांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागते. उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सर्वप्रथम आपल्या गावातील तलाठ्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळू शकत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तलाठी कार्यालयासमोर रांगा लागल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे अधिवास प्रमाणपत्रासाठी जन्म दाखल्याची आवश्यकता असल्यामुळे त्याची वेबसाईट सुध्दा संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अशा समस्यांना नगरिकांना सामोरे जावे लागत आहे. अर्ज करण्यासाठी १५ जुलै हा शेवटचा दिवस असल्याची माहिती सगळीकडे जाताच अजून त्या गर्दीत भर पडली. परंतू प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ ठेवण्यात आली आहे. काही बदल सुध्दा करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांनी सप्टेंबर महिन्यात जरी अर्ज केला तरी त्यांना जुलै व ऑगस्ट महिन्यातील लाभाचा हप्ता मिळेल अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान भवनात दिली आहे. त्यामुळे नगरिकांनी घाई न करता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे. कुठे दलालांच्या माध्यमातून पैशांची मागणी होत असल्यास त्यांनी तात्कळ प्रशासनाला कळवावे असे आवाहन सुध्दा करण्यात आले आहे. जे अव्वाच्या सव्व पैसे घेतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

“ मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठीचा ऑफलाईन अर्ज हा अंगणवाडी सेविकांकडे किंवा झेरॉक्स सेंटरवर उपलब्ध राहिल. तो अर्ज भरून त्या अर्जासोबत आधारकार्ड, रेशनकार्ड, डोमिसिल, उत्पन्नाचा दाखला व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे जमा करावी. त्यानंतर ऑफलाईन अर्ज हा ऑनलाईन करून अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, अशा वर्कर किंवा अंगणवाडी पर्यवेक्षक यांच्याकडे जमा करावा. त्यानंतर याची छाननी झाल्यानंतर पात्र आणि अपात्र लाभार्थी वेगळे काढण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. १५ जुलै ही शेवटची तारीख नसून घाई करून नका ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येईल. ज्यांनी संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांचा १ हजार ५०० रूपयापर्यंतचा लाभ घेतला असेल त्यांना हा लाभ मिळणार नाही. तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस व अशा वर्कर यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तरी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी (जि.प. बुलढाणा)

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत