‘नारीशक्ती दूत अॅप’ च्या माध्यमातून अर्ज करण्याची सुविधा
बुलढाणा, ४ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी): महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला १ जुलै रोजी सुरुवात झाली आहे. त्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पत्रकार परिषद अयोजित केली होती. यावेळी त्यांनी सांगितले की, काही अटींबाबत शासनाने शिथीलता आणली आहे. उत्पन्नाचा दाखला नसेल तर राशन कार्ड ग्राहय धरले जाणार आहे. तसेच अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्यांच्याकडे १५ वर्षापूर्वीचे मतदान कार्ड, राशन कार्ड हे ग्राहय मानले जाणार आहे. त्यामुळे नगरिकांनी कुठे हे गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच कुठे सीएससी सेंटर किंवा तलाठी शिल्लकचे पैसे घेत असेल त्यांच्या वर कारवाई करण्यात येईल. एका कुटूंबातील दोन महिलांना याचा लाभ घेता येणार आहे. हा अर्ज अंगणवाडी सेविका किंवा सीएससी सेंटरवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. मोबाईलवर घरबसल्या नारीशक्ती दूत अॅपवर सुध्दा या योजनेचा ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो. अर्ज केल्यानंतर त्याची छाननी करण्यात येईल जर अर्धवट अर्ज असेल तर अर्ज स्विकारला जाणार नाही. ज्यांनी आपले बँक खाते काढले नसेल. त्यांनी तात्कळ बँक खाते काढून सदर योजनेचा लाभ घ्यावा. संजय गांधी निराधार किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही. ज्यांचे उत्पन्न २ लाख ५० हजाराच्या आत असेल अशा सर्व महिला याचा लाभ घेऊ शकतात. महिलांनी अर्ज भरून अंगणवाडी सेविका, मदतनीस, अशा सेविका किंवा अंगणवाडी पर्यवेक्षीका यांच्याकडे जमा करावा. कुठे जर गैर प्रकार आढळल्यास तात्कळ प्रशासनाशी संपर्क साधवा. जे गैरप्रकार करीतल अशांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे. यावेळी जिल्हा परिषद बुलढाणाचे कार्यक्रम आधिकारी प्रमोद येंडोले व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.