spot_img

डॉ. सुभाष चव्हाण कायदेशीर लढाईच्या तयारीत : कर्मचारीही ईट का जवाब पत्थर से देण्याच्या तयारीत

बुलढाणा, 5 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः निलंबीत झालेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी राज्य शासनाच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरु केली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या गोष्टीची कुणकुण लागताच जिल्हा सामान्य रूग्णालयातील कर्मचारी संघटनेने डॉ. चव्हाण यांना कायदेशीर लढाईतच घेरण्याचे ठरविले असून निलंबनाच्या आदेशाला ‌‘कॅव्हेट‌’चे संरक्षण देण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. डॉ. चव्हाण यांच्या निलंबनाला स्थगिती मिळू नये म्हणून कायदेशीर मार्ग अवलंबण्याचे निश्चीत केलेले हे त्ोच कर्मचारी आहे, ज्यांनी आज डॉ. चव्हाण निलंबीत झाल्याच्या आनंदात किलोने पेढे वाटलेत. काही महिन्यांपूर्वी डॉ. सुभाष चव्हाण यांनी जिल्हा शल्य चिकित्सक पद मिळविले. त्ो कसे मिळविले, हे अनेकांना माहितच आहे. परंत्ुा आपले सहकारी किंवा कर्मचारी यांच्या मनात आदराचे स्थान  डॉ. चव्हाण अपयशी ठरलेत. म्हणूनच त्यांच्याविरोधात जिल्हा सामान्य रूग्णालयात नाराजी वाढत गेली. मागील फेब्रुवारी महिन्यात बिबी-सोमठाणा येथे प्रसादात्ूान विषबाधेमुळे 600 पेक्षा अधिक भाविक घायाळ झाले होत्ो. त्यांचा योग्य उपचार करण्यास सामान्य रूग्णालय प्रशासन कमी पडले, असा ठपका दस्तरखुद्द मुंबई उच्च न्यायालयाने ठेवला होता. उच्च न्यायालयाने व्यक्त केलेला हा संताप राज्याच्या आरोग्य विभागाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांच्या निलंबनात्ूान शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. काल संध्याकाळनंतर डॉ. चव्हाण यांना निलंबीत करण्यात आल्याचे आदेश कार्यालयात धडकले. त्यांच्या जागी अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांना जिल्हा चिकित्सकाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. आपल्यावरील कारवाई स्थगित व्हावी म्हणून डॉ. चव्हाण न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी यासंदर्भात नागपूर येथील एका गाजलेल्यावकीलाशी बोलणीही केली असल्याची माहिती कर्मचारी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी गुड इव्हिनिंग सिटीला दिली आहे. काहीही झाले तरी डॉ. चव्हाण पुन्हा जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून नकोत, असा निर्धार करीत कर्मचारी संघटना न्यायालयीन लढाई लढण्याचा संकल्प करीत आहे. बुलढाण्यातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.प्रविण वाघमारे यांच्यामार्फत कर्मचारी ‌‘ईट का जवाब पत्थर से‌’ देणार असल्याचे समजत्ो. विशेष म्हणजे डॉ. चव्हाण यांनी नागपूर हायकोर्टात स्थगितीचा अर्जही दाखल केला आहे. निलंबनाला स्थगिती मिळू नये म्हणून कर्मचारी उद्या कॅव्हेट दाखल करणार असल्याची पक्की माहिती आहे. न्यायालयाच्या या लढाईत उद्या काय होईल? याकडे बुलढाणा जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. कॅव्हेट जिंकणार की, स्थगिती मिळणार ? यासाठी उद्याची गुड इव्हिनिंग सिटीची ‌‘ब्रेकींग‌’ चुकवू नका.  कारण डॉ. चव्हाण यांच्या निलंबनाची, डॉ. भुसारी यांना प्रभार मिळाल्याची आणि निलंबनामागे बिबीचे प्रकरण असल्याची पहिली ब्रेकींग गुड इव्हिनिंग सिटीनेच आपल्यापर्यंत पोहोचविली आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत