नविन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भुसारी यांची ग्वाही

बुलढाणा, ५ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदावरून डॉ. सुभाष चव्हाण यांचे निलंबन करण्यात आले आहे. डॉ. भागवत भुसारी यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा पदभार देण्यात आला आहे. आज गुड इव्हिनिंग सिटीचे चिफ रणजीतसिंग राजपूत यांनी सिटी प्लस चॅनलसाठी डॉ. भागवत भुसारी यांची मुलाखत घेतली तेव्हा डॉ. भागवत भुसारी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सिटी प्लसशी बोलतांना सांगितले की, बुलढाणा जिल्ह्याचा रहिवाशी असल्यामुळे मागील २१ वर्षापासून काम करत आहोत. मला आनंद होत आहे की, स्वतःच्या जिल्ह्यात आरोग्याची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. माझं भाग्य आहे की डॉक्टर म्हणून मला सेवा देता येणार आहे. सर्वात प्रमुख्याने विचार जर केला तर कर्मचारी, अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत. आमच्याकडे येणाऱ्या रूग्णाचे समाधान झाले पाहिजे त्याला ज्या सुविधा दिल्या आहेत. त्या दिल्या गेल्या पाहिजेत. सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, लोकांचा जो दृष्टिकोन आहे की सरकारी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर आपलं काम होत नाही. तिथे आरोग्याचे व स्वच्छतेच्या बाबतचे जे प्रश्न आहे. ज्यामध्ये बेडशीट, बेड किंवा डॉक्टर भेटत नाही. याबाबत नाराजी असते, सर्वांनी मिळून जर काम केले तर लोकांच्या समस्या कमी होऊ शकतात. गेल्या काही वर्षांपासून काम करातांनाचा अनुभव आहे की, आपण जर रुग्णाला समजून सांगितलं तर त्याच्या तक्रारी निश्चित कमी होतात. त्या रूग्णाला सुट्टी झाल्यानंतर तो कुठलीही तक्रार करीत नाही. तो आनंदाने घरी जातो हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा व्यक्तिगत अनुभव आहे. येत्या काळात जिल्हा सामान्य रूग्णालय असेल किंवा याच्याशी संलग्नीत जे ही रूग्णालय आहे. त्यातून सामन्य माणसाला आरोग्याची चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, त्यासंदर्भात तशी ग्वाही सुध्दा समान्य जनतेला देत आहोत. रूग्णसेवेच्या बाबतीत नगरिकांना आवहान करतो की, ज्या सेवा आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्या १००% आम्ही देऊ, एखाद्या डॉक्टरांनी किंवा कर्मचाऱ्यांनी जर कोणाची पिळवणूक होत असेल किंवा त्रास होत असेल तर त्यांनी आम्हाला सांगावे. माझ्याकडे जरी कोणाला व्यक्तिगत काही तक्रार करायची असेल तर तो करू शकतो. भेटायचे जरी असल्यास मी त्यासाठी उपलब्ध राहिल. मी त्यांच्यासाठी रूग्णसेवा ही सामान्य रुग्णालयाच्या माध्यामातून झाली पाहिजे. ती लोकांना भेटली पाहिजे यासाठी सदैव बांधील असल्याचेही ते म्हणाले.