बुलढाणा, १२ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मंजूर झाली आहेत. सन २०२३ – २४ खरीप हंगामात अंतर्गत जिल्ह्यातील २,४२,१३४ शेतकऱ्यांना १६१,८६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली होती त्यापैकी ६,७८,७४ शेतकऱ्यांना ३८.३८ कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई वितरित करण्यात आले आहे त्यातील १,७४,२६० शेतकऱ्यांना १२३.४८ कोटी रुपयाची नुकसान भरपाई देणे प्रलंबित आहे. तर रब्बी हंगामात ७५,१०५ शेतकऱ्यांना १०१.०९ कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली होती त्यातील ९,२८२ शेतकऱ्यांना १२.९३ कोटी रुपये नुकसान भरपाई वितरित करण्यात आले असून ६५,८२३ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करणे अजून बाकी आहे. राज्या सरकारकडून पीकविम्याची नुकसान भरपाई दिल्या जात आहे. अनेकांच्या खात्यात हि रक्कम पडली आहे. परंतू काही शेतकऱ्यांच्या खात्यात अत्यल्प रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा काढल्यानंतर शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर ऑनलाईन तक्रार नोंदवले तर काहींनी सर्व्हरच्या समस्यमुळे ऑफलाईन तक्रार सुध्दा पीक विमा कंपनीच्या कार्यालयात तक्रार सुध्दा केली होती. तक्रार केल्यानंतर पीकवीमा कंपनीच्या प्रतिनिधींनी त्याठिकाणी जाऊन पंचनामे सुध्दा केले आहे. तरी काही शेतकऱ्यांना क्षेत्रसाखेच असतांना सुध्दा काहींना अत्यल्प रक्कम मिळाली आहे. तर काहींना समाधानकारक रक्कम मिळाली आहे.

अतिवृष्टी झाल्यामुळे हरभरा पिकाचे नुकसान झाले होते. तेव्हा पीक विमा कंपनीच्या अॅपवर तक्रार दिली होती. त्यानंतर १० दिवसांनी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी येऊन पंचनामे केले होते. परंतू अनेक शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली आहे. परंतू अद्याप आमच्या खात्यात पीक विमा जमा झालेला नाही. तर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अत्यल्प पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे.
