• शेतकऱ्यांची डिपॉझिट रक्कम देण्यास टाळाटाळ
• शेतकरी बळीराम चंदेल यांची पोलिसांत तक्रार
• व्यवस्थापक राजेश देशमुख संशयाच्या भोवऱ्यात
बुलढाणा, १३ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) शेतकरी हा अस्मानी आणि सुल्तानी संकटाला तोंड देत आपल्या शेतातील पीकाला जोपासात, शेतात रात्रंदिवस घाम घाळून कुठे तरी उत्पन्न घेत असतो.पण त्यांने कमविलेल्या पैशांवर सुध्दा अनेकांचा डोळा असतो. कधी एखादा अडत व्यापारी हा शेतकऱ्याला दुप्पट हमीभाव देतो म्हणून त्याच्याकडून शेतमाल खरेदी करतो. शेतकऱ्याला पैशाची आवश्यकता असली तेव्हा तो व्यापाऱ्याकडे जातो. तर व्यापरी हा त्याचे तेथून गुऱ्हाळ बांधून पसार होतो. तर कधी बोगस बियाणे प्रकरणात शेतकऱ्याला फसवले जाते. असाच फसवण्याचा प्रकार बुलढाण्यातील चिखली रोडवरील चिराग अर्बन कॉ. ऑफ क्रेडीट सोसायटी लिमिटेड बुलढाणा या बँकेने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सावळा येथील शेतकरी बळीराम फुलसिंग चंदेल यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांची सोयबीन विकली होती. त्यानंतर त्यांना चिराग अर्बनचे व्यवस्थापक राजेश देशमुख यांनी सांगितले की आमच्या बँकेत तुम्ही पैसे जमा करा. तुम्हाला आम्ही पैसै जमा केल्यानंतर महिन्यांप्रमाणे व्याज देऊ यावरून त्यांनी चिराग अर्बन बँकेत विकलेल्या सोयबीनचे २२ फेब्रुवारी २०२४ रोजी १ लाख ६० हजार रूपये जमा केले. तय नंतर चिराग अर्बन बँकेत विकलेल्या सोयबीनचे २२ फेब्रुवारी २०२४ रोजी १ लाख ६० हजार रूपये जमा केले. थांबा उद्या पैस देतो असे सांगण्यात आले परंतू त्यांना एक महिना झाला तरी पैसे देण्यात आले नाही. चिराग अर्बनचे व्यवस्थापक राजेश देशमुख हे बाहेरगावी गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते बँकेत आले नाही. सध्या बँकेत फक्त एकच कर्मचारी आहे. राजेश देशमुख यांना फोन लावल्यानंतर ते फोन उचलत नाही. या बँकेत अनेक शेतकऱ्यांचे पैसे अटकल्याची माहिती मिळाली आहे. बळीराम चंदेल यांनी आज बुलढाणा शहर पोलिस स्टेशन मध्ये बँकेविरूध्द तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करून शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा असे पिडीत शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.