spot_img

लाखोंची झाडे, मोकाट ढोरांच्या पोटात !

बुलढाणा, १७ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) माझी वसुंधरा ५.० अभियान अंतर्गत बुलढाणा नगर परिषदेचा राज्यात नावलौकिक झाला आहे. बारामतीला मागे टाकून बुलढाणा नगर परिषद राज्यात अव्वल क्रमांक प्राप्त करेल, असा आत्मविश्वासही आमदार संजय गायकवाड यांनी माणसाएव्हढ्या झाडांचे वृक्षारोपण प्रसंगी येथील महावीर नगरमध्ये व्यक्त केला होता. पण कशाच्या भरवश्यावर ? जर पुढचे पाठ आणि मागचे सपाट, अशी अवस्था वृक्षारोपण कार्यक्रमाची असेल तर बुलढाणा पुन्हा हिरवेगार होईल कसे ? कारण लाखो रुपये खर्च करून, हजारो किलोमिटर दूरून आंधप्रदेशमधून आणलेली झाडे सुरक्षीत नसतील तर ! मोकाट फिरणारी गुरे-ढोरे या उंच झाडांनाही येन-केन प्रकारे आपले भक्ष्य बनवित आहेत. म्हणून सर्वप्रथम आमदार महोदयांनी नगर प्रशासनाला मोकाट जनावरे पकडण्यासाठी बाध्य करावे. ‘आम्ही तीन दिवसांपासून मोकाट जनावरांना पकडण्यासाठी युद्धस्तरावर मोहिम राबवित आहोत’, असे उत्तर नगर परिषदेकडून निश्चीतच मिळेल. परंतु ही मोहिम किती प्रामाणिकपणे राबविली जात आहे, याची खातरजमा मुख्याधिकारी महोदयांनी करणे आवश्यक आहे. वाहतूकीला अडथळा निर्माण करणारी ही जनावरे अनेकांच्या अपघातास कारणीभूत ठरत आहे. एव्हढेच नव्हे तर मोठ्या कष्टाने नगर परिषद यंत्रणेने लावलेली ही उंच झाडे वाकवून ती फस्त करण्याचे वेगळे कौशल्य या मोकाट जनावरांच्या अंगी निर्माण झाले आहे. केवळ प्रमुख मार्गांवरची जनावरे पकडून होणार नाही तर गल्ली बोळात फिरणारी आणि खुल्या भूखंडांमध्ये चरणारी जनावरेही पकडावी लागतील. शहरातील अनेक ओपन स्पेसमध्ये यावर्षी नगर परिषदेने तसेच सामाजिक संस्थांनी वृक्षारोपण केलेले आहे. या सर्व झाडांना वाचविणे गरजेचे आहे. ६ हजार झाडे आणली गेली आहेत. ज्यांची किंमत लाखोंच्या घरात आहेत, हे महत्वाचे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत