‘भांडे देतेय सरकार, स्टिकर लावताय आमदार’
बुलढाणा, १८ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) सध्या सर्वत्र दोनच योजनांसाठी मोठी धावपळ सुरु आहे. ‘लाडली बहिण’ आणि ‘सरकारी कामगार’, या दोन योजनांचा लाभ घेण्यासाठी गर्दीच गर्दी होत आहे. परंतु सरकारी कामगारांना साहित्य वाटपात प्रचंड भ्रष्टाचार तसेच दंडेलशाही सुरु असून सत्ताधारी आमदारांनी साहित्य आपल्या गोडावूनमध्ये दाबून ठेवले असल्याचा गंभीर आरोप करीत काँग्रेसच्या वतीने आज धडक मोर्चा काढण्यात आला. जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी आज मोठी धडक दिली. यावेळी सरकारी कामगार अधिकारी ‘बॅकफूट’वर जावून ‘डिफेन्सिव्ह’ मोडमध्ये दिसून आले. कामगारांसाठी सरकारने योजना लागू केल्यापासून हजारो कामगारांची नोंदणी झाली आहे आणि सुरुही आहे. यात आता बोगस कामगारांचाही समावेश झाला असून घरोघरी कामगार आढळत आहेत. पेट्या आणि भांडे घेण्यासाठी कामगारांची तोबा गर्दी होत आहे. कामगारांच्या पेट्यांमध्ये नेत्यांना मतांची पेटी दिसत असल्यामुळे बहुतांश आम्दारांनी आपली स्वतः ची यंत्रणा उभारून आपल्याच हद्दीतून कानगारांना साहित्य वाटप करायला सुरुवात केली आहे. काही आमदारांनी सरकारच्या या मदतीवर स्वतःचे स्टिकर छापून आपला छुपा प्रचारही सुरु ठेवला आहे. यात सत्ताधारी आमदार आघाडीवर आहे. या प्रकाराने आघाडीचे नेते प्रचंड चिडलेले आहे. जे सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील आहे, त्यांनाच साहित्य वाटप केले जात असून इतर पक्षाशी संबंधीत मजूरांना डावलले जात असल्याचाही आरोप आहे. या वाटपात मोठा भ्रष्टाचार आहे. कमिशनबाजी सुरु आहे आणि कामगार अधिकारी कार्यालयाकडून भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यात येत आहे. असे विविध आरोप आजच्या धडक आंदोलनात करण्यात आले. नोंदणीकृत कामगारांना साहित्य वाटपात मोठा भ्रष्टाचार असून सत्ताधारी आमदारांच्या गोडावूनमध्ये साहित्य पोहोचलेच कसे ? असा संतप्त सवाल काँग्रेसने उपस्थित केलाय.. आज शेकडोंच्या संख्येने जिल्हा काँग्रेसच्या वतीनं सरकारी कामगार कार्यालयावर धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.. आमदार धीरज लिंगाडे यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय नेते हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे, राज्याच्या नेत्या अॅड. जयश्रीताई शेळके यांनी आज कामगार कार्यालयावर धडक दिली.. सरकारी कामगार अधिकारी आनंद राठोड यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती झाली.. आंदोलक नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनी राठोड यांची चांगलीच भंबेरी उडाली होती. मांडे सरकारी आणि स्टिकर आमदाराचे, हा प्रकार खपवून घेणार नाही, अरां आ. लिंगाडे म्हणाले. विशेष म्हणजे ‘माझ्याकडे याबाबत व्हिडीओ क्लिप आहेत, दाखवू का!’, असे खुले आव्हानसुद्धा आ. लिंगाडे यांनी दिले होते. तर पत्रकार परिषद घेवून साहित्य वाटप करा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राहुल बोंद्रे यांनी कॅबीनमध्ये जावून सरकारी कामगार अधिकान्यांना चांगलंच धारेवर धरले. यासंदर्भात राहुल बोंद्रे यांनी आठ दिवसांचा अल्टीमेटम देत कायदा हातात घेण्यासंदर्भात राहुल बोदे कामगार कार्यालयाला दिलाय. आता तालुकास्तरावर उद्यापासून कामगारांना साहित्य वाटप करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया कामगार अधिकारी आनंद राठोड यांनी दिली आहे. काँग्रेसच्या धडक मोर्चाने कामगार अधिकारी कार्यालयाला चांगलीच धडकी भरवलीय, हे खरंय.. परंतु मोर्चेकऱ्यांनी उपस्थित केलेल्या मागण्यांबाबत कानगार कार्यालय किती गंभीर कार्यवाही करेल, हे येणाऱ्या दिवसांत कळेलच. आजच्या धडक आंदोलनात माजी आमदार दिलिपकुमार सानंदा, चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संतोष वानखेडे, समाधान सुपेकर, कुणाल बोंद्रे, सुनिल सपकाळ, नंदिनीताई टारपे, डॉ. पुरुषोत्तम देवकर, शैलेश खेडेकर, नंदकिशोर शिंदे, अनिकेत मापारी व कामगार सेलच्या पदाधिकाऱ्यांसह कामगारांची उपस्थिती होती.