spot_img

संदिप शेळके यांनी बांधले शिवबंधन

बुलढाणा, 23 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुलढाणा वन मिशनचे संदीप शेळके यांनी बांधले शिवबंधन बांधले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश बुलडाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासह सामाजिक, राजकीय, आरोग्य व महिला बचत गटात आपले नावलौकिक करणारे तसेच २०२४ ची बुलढाणा लोकसभा अपक्ष लढलेले वन मिशनचे संदीप शेळके यांनी आज दिनांक २३जुलै रोजी मातोश्री मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच सचिव खा. विनायक राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, व जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटीका सौ चंदा ताई बढे , उप जिल्हा प्रमुख सुनील घाटे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, किसान सेना उप जिल्हा प्रमुख गजानन उबरहंडे, उप तालुका प्रमुख विजय ईतवारे यांची उपस्थिती होती.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत