■ कार्यकर्ता मेळाव्यातून हर्षवर्धन सपकाळांचे शक्तीप्रदर्शन
बुलढाण्याची जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी

बुलढाणा, २ ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी/अजय काकडे) विधानसभेचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा काँग्रेसचे राष्ट्रीय नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा गर्दै हॉल मध्ये मेळावा आयोजित केला होता. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्ता मेळाव्यातील मनोगतातून विधानसभा निवडणूक लढण्याविषयी भुमिका मांडली. त्यांनी सांगितले की, लोकसभेच्या वेळी सर्व म्हणत होते की, तुम्ही उभे रहा, पण संधी मिळाली नाही. माझे दुःख आणि माझ्यावर झालेला अन्याय मी व्यक्त करू शकत नाही. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर सर्व लोकं म्हणत होते की, तुम्ही असते तर नक्की निवडून आले असते. बुलढाण्याची सीट ही महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सीटांमध्ये सर्वाधिक मताने निवडून आली असती. जर काँग्रेसची उमेदवारी भेटून निवडून आलो असतो तर काँग्रेसला जिल्ह्यात नव संजवनी दिली असती. महाविकास आघाडीतील मित्रपक्षाच्या प्रमुखांचा फोन आला की.. आमच्याकडे या.. आमची उमेदवारी घ्या, पक्ष बदला असता.. तर गद्दारीचा ठप्पा पडला असता. या जागेवर उबाठा आपला हक्क सागेल हे निश्चित पण ही जागा काँग्रेसला सुटली पाहिजे. विधानसभेच्या दृष्टीने सर्वांशी चर्चा करून.. २० ऑगस्टला भुमिका ठरू, उबाठा गटात.. गटतटाचे राजकारण मोठ्याप्रमाणात आहे. त्यांना जर ही जागा सुटली.. तर त्यांचा पराभव होऊ शकतो. आता सध्या.. टक्केवारीला ऊत आला आहे. २०१९ ला बुलढाण्याची काँग्रेसची जागा ही वंचीतच्या उमेदवारामुळे गेली. दलित घटकातील मतदार वंचीकडे गेल्याने त्यावेळी पराभव झाला. पण आता यावेळी नक्की काँग्रेसचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गर्दै हॉल मधील मेळाव्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांशी संबंधीत प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आली. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.