15 ऑगस्टपर्यंत गणवेश उपलब्ध होण्याची शक्यता धुसरच
बुलढाणा, 7 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी/अजय काकडे) :- 1 जुलै रोजी जिल्ह्यातील शाळेचे नवीन सत्र सुरू झाले होते. शाळा उघडून एक महिना उलटला तरी विद्यार्थ्यांना अजून गणवेश उपलब्ध होऊ शकला नाही. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व विद्यार्थी शाळेचा गणवेश घालून स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवात सहभागी होत असतात. स्वातंत्र्य दिन हा एका आठवड्यावर आला आहे. आता कुठे जिल्हा परिषदला गणवेशाचे कापड उपलब्ध झाले आहे. ते शिवायचे कधी अन् घालायचे कधी हा प्रश्न उपस्थित झाला आहे. गुड इव्हिनिंग सिटीने शिक्षणाधिकारी बी.आर. खरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कापड उपलब्ध झाल्याचे सांगितले. परंतु शिवून कधी मिळेल, याबाबत निश्चीतपणे त्यांना सांगता आले नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यात विधानभवनात शालेय गणवेशावरून खडाजंगी उडाली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, कापड चांगल्या दर्जाचे आहे. विद्यार्थ्यांना शौक्षिणीक सत्र सुरू होण्याधी गणवेश वितरीत केला जाईल. परंतू अद्याप गणवेश विद्यार्थ्यांपर्यंत सोडाच पण जिल्हा परिषदला सुध्दा प्राप्त झाले नाही. सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हाफ पँट देण्यात येणार आहे. परंतू सर्वत्र विद्यार्थी फुल पँटचा अग्रह धरत असतांना त्यांना हाफ पँट शिवावी लागणार आहे. आता काळानुरूप शाळेच्या ड्रेसमध्ये बदल करून फुल करण्यात आले होते. पण पुन्हा प्रशासनाने नविन नियमानुसार हाफ पँटचा आग्राह धरल्याचे दिसत आहे.

केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा मधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सर्व समाजातील मुला- मुलींना मोफत गणवेश वाटप करण्यात येतो, सदर योजना 2023-24 पासून सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या शैक्षणिक वर्षापासून राज्यात एक राज्य एक गणवेश धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे, 15 जून पासून नियमवली जारी करण्यात आली, तसेच मोफत गणवेश योजनेअंतर्गत देण्यात येणार्या गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे. राज्यातील शाळा 15 जून पासून सुरू झालेले आहेत, सुरुवातीला विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्याचे ठरवलेले असताना जिल्हा परिषद शाळेमधील अनेक विद्यार्थ्यांना अजून सुद्धा गणवेशाचे वाटप करण्यात आले नाही, विना गणवेशाचेच विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट ला शाळेत ध्वजावंदनासाठी जावे लागणार काय अशी शक्यता निर्माण झाली आहे, गणवेशाचे कापड जरी शासनाने विद्यार्थ्यांना दिले तर सर्वच विद्यार्थी एकदम गणवेश कसा काय शिवतील हा ही प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे, विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच दोन गणवेश मिळावीत यासाठी राज्य शासनाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्व जिल्ह्यासाठी 215 कोटी 53 लाखाचा निधी वितरित केला आहे, मग एवढं असून सुद्धा अजूनही जिल्हा परिषद मधील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप का झाले नाही, राज्यात एक गणवेश अंतर्गत मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट, आणि गडद निळ्या रंगाची पॅन्ट, किंवा हाफ पॅन्ट, तर मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा गडद निळ्या रंगाचे सलवार कशी रंगाची कमीज विद्यार्थ्यांच्या शर्ट वरील शोल्डर ट्रिप आणि दोन किसे असणे आवश्यक आहे. असे गणवेशाचे स्वरूप असणार आहे, शिवाय गणवेश सोमवार बुधवार व शुक्रवार व स्काऊट गाईड गणवेश मंगळवार गुरुवार शनिवार असे ठराविक दिवस शासनाने ठरवून दिलेले आहेत, सदर स्काऊट गाईडच्या गणवेशा शिलाई साठी शंभर रुपये प्रति गणवेश व अनुवंशिक खर्च 10 असे एका गणवेशासाठी 110 रुपये प्रति विद्यार्थी इतकी रक्कम संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी वर्ग करावी अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत, तरीसुद्धा जिल्हा परिषद शाळांना अजूनही गणवेश मिळाला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन पैकी निदान स्वतंत्र दिना साठी तरी एक गणवेश मिळावा अशी मागणी पालकांमधून व्यक्त होत आहे.