spot_img

खेडेकरांची कपिलची संजय राऊतांकडे अपील

चिखली उबाठाला सोडून घ्या

बुलढाणा, 13 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे शेगाव येथे बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा नुसार आढावा घेण्यासाठी आले असता चिखली विधानसभा मतदार संघ शिवसेना ऊबाठांलां सोडण्याची मागणी यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा अनुसार आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत त्याचप्रमाणे शिवसेना संपर्कप्रमुख प्रा.नरुभाऊ खेडेकर आणि जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी शेगाव येथील विश्रामगृहात जिल्ह्यातील विधानसभा नुसार आढावा घेतले. यावेळी ठराविक  पदाधिकारीच आमंत्रित होते. यावेळी चिखली विधानसभेतून उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर, तालुकाप्रमुख श्री किसन धोंडगे, शहर प्रमुख श्रीराम   झोरे, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे, विष्णू मुरकुटे, गजानन पवार, संतोष वाकडे, अशोक सुरडकर आणि आनंद घ्यायची इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आढावा देत असताना कपिल खेडेकर यांनी लोकसभेमध्ये सर्वाधिक मताधिक्य चिखली विधानसभा मतदारसंघात मिळालेले आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेच्या दोन सभा चिखली मध्ये झालेले आहेत. आणि पक्ष त्याचप्रमाणे संघटनेची पूर्णपणे बांधणी संपूर्ण विधानसभा मतदारसंघांमध्ये चांगली झालेली आहे. येणाऱ्या काळात मध्ये संधी मिळाल्यास नक्की चिखल विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही उपस्थित खासदार संजय राऊत यांना दिली. आणि विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना ऊबाठां यांना सोडण्यात यावा अशी मागणी कपिल खेडेकर यांनी केली.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत