spot_img

‘पैशांची उधळपट्टी कमीशनबाजीसाठी’

काँग्रेस नेत्यांची आ. संजय गायकवाड यांच्यावर प्रखर टिका

बुलढाणा, १३ ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : काँग्रेसची आज विधानसभ निवडणूकीच्या अनुषगांने बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या आधी काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत बुलढाण्याचे आ. संजय गायकवाड यांच्यावर टिका केली आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आमदार म्हणून संजय गायकवाड ओळखले जातात.. त्यांनी सांगितलेलं कुठलंही काम मुख्यमंत्र्यांच्या दरबारी अडत नाही.. आ. गायकवाडांवर असलेल्या मेहेर- नजरमुळं मुख्यमंत्र्यांकडून बुलढाणा मतदार संघात निधीचा ओघ वाहतोय.. यातून अनेक विकास कामं मतदारसंघात सुरुय.. करोडो रुपयांचा निधी विविध कामांवर खर्च करण्यात येतोय.. परंतु आ. गायकवाड यांनी केलेली विकास कामं कमीशनखोरीसाठी असल्याचा थेट आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.. केवळ वडेट्टीवारच नव्हे तर काँग्रेसचे विधानसभा निवडणूक महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नी थला आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही आ. गायकवाड यांच्यावर टिकेची झोड उठविलीय… निवडणूक आढावा बैठकीसाठी रमेश चेन्नीथला बुलढाणा दौऱ्यावरायत.. त्यांनी आज पत्रकारांशी बुलढाणा रेसीडेन्सीच्या सभागृहात संवाद साधला.. यावेळी चेन्नीथल, बाळासाहेब थोरात आणि ना. वडेट्टीवार यांनी पत्रकारांना संबोधित केलं.. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारवर टिका करतांना या सरकारला महाभ्रष्टाचारी म्हटलं.. ईतिहासात याची नोंद घेतली जाईल.. असं म्हणतानाच त्यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचं नांव न घेता त्यांना कमीशनखोर, दादागिरी करणारा तसेच खोकेबाज आणि धोकेबाज आमदार अशी जहरी टिका केलीय. कुणी अंगावर आलं की शिंगावर घेण्याचा आ. संजय गायकवाड यांचा स्वभावाय.. त्यामुळे स्थानिक काँग्रेस नेते असो की, इतर पक्षाचे पदाधिकारी, सहसा त्यांच्या वाट्याला कुणी जात नाही.. मागील पाच वर्षांत पहिल्यांदाच कुणीतरी त्यांच्यावर एव्हढी भयंकर टिका केलीय. यावेळी महराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सत्तेज पाटिल, आ.राजेश एकडे, आ. धिरज लिंगाडे, जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, अनिस अहमद, राणा दिलीपकुमार सानंदा, शाम उमाळकर, जयश्रीताई शेळके, नाना गावंडे, कुणाल राऊत यांची उपस्थिती होती.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत