विविध मागण्यांसाठी २९ ऑगस्ट पासून कर्मचारी संपावर
बुलढाणा, २२२ ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : राज्यातील जिल्हा परिषद देखील २९ ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जात आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियान याबाबत प्रसिध्दीपत्रक प्रकाशीत केले आहे. युनियनचे ८ जुलै रोजी प्रमुख प्रलंबित मागण्यांचे निवेदन, त्यासोबत राज्यातील काही आमदारांना दिले आहे. २९ जुलै रोजी दिलेल्या निवेदनानुसार शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून कामकाज केले तर ९ ऑगस्ट २०२४ रोजी लक्षवेध म्हणून राज्यभर तीव्र निदर्शने केले. गेल्या २-३ वर्षापासून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरावर प्रलंबित मागण्यांवर चर्चा होऊन सकारात्मक निर्णय व्हावेत यासाठी प्रयत्नात आहोत, परंतु शासनाकडून विशेषतः ग्रामविकास विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये शासनाच्या या उदासिन धोरणामुळे मनात चिड आहे. त्याचाच परिपाक म्हणून खाली नमुद केलेल्या प्रमुख मागण्यांसाठी २९ ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जात आहोत. यामध्ये प्रमुख प्रलंबित मागण्यांचा समावेश आहे. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहीरात / अधिसूचना केलेल्या पदावरील नियुक्तांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम (निवृत्ती वेतन) नियम १९८२ अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्याचा निर्णय पारीत झाला. परंतु जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जवळपास ६ महिन्यांचा कालावधी होऊन देखील ग्रामविकास विभागाने निर्णय जारी केला नाही. तो त्वरीत जारी करावा. गेल्या २ ते ३ वेतन आयोगापासून जिल्हा परिषद मधील लिपीक, लेखा, परिचर, वाहन चालक, आरोग्य आदी संवर्गांवर निकृष्ट वेतनश्रेण्या दिल्या जात आहेत. त्या त्रुटी दूर व्हाव्यात. सेवानिवृत्ती उपादान, मृत्यू उप- ादानाची मर्यादा केंद्रा प्रमाणे रु. २५ लाखापर्यंत वाढविण्यात यावी. विविध विभागात विविध संवर्गातील रिक्त असलेली सर्व पदे पद- ोन्नतीने, नियुक्तीद्वारे कायम स्वरुपी भरण्यात यावी. सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करावे. जिल्हा परिषद कर्मचारी २९ ऑगस्ट पासून, राज्य सरकारी जिल्हा परिषद निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती बरोबर मागण्या व उद्दिष्ट समान असल्याने या बेमुदत संपात सहभागी होत आहोत. त्यामुळे या समन्वय समितीच्या ज्या मागण्या आहेत, त्या देखील आमच्याही मागण्या आहेत याशिवाय जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या काही वेगळ्या मागण्या आहेत, त्या संदर्भात आम्ही यापूर्वीच ग्रामविकास विभागाला सविस्तर निवेदन दिलेले आहे. परंतु दुर्दैवाने त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे देखील या बेमुदत संपावर जाण्याची पाळी आलेली आहे. असे महराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनकडून दिलेल्या प्रसिध्दा पत्रकात म्हटले आहे.