सैराटाच्या आर्चीची आणि जरीन खान ची विशेष उपस्थिती
बुलढाणा, 27 ऑगस्ट ( गुड इव्हिनिंग सिटी) : विदर्भातील सर्वांत मोठी दहीहंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महा दहीहंडीचे आयोजन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात धार्मिक सन आणि उत्सव असतात, या मध्ये श्रावण सोमवारचे उपवास, दहीहंडी यांसारखे अनेक उत्सव असतात. याच धर्तीवर महायुतीच्या वतीने विकासाची महा दहीहंडीचे आयोजन आज 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपासून चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये करण्यात आले आहे. विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार श्वेताताई महाले यांच्या संकल्पनेतून साजरा होणाऱ्या भाजपा युवा मोर्चा तर्फे आयोजित या दहिहंडीच्य विशेष आकर्षण सैराट चित्रपट फेम रिंकू राजगुरू आणि बॉलीवूड सिने अभिनेत्री जरीन खान ह्या राहणार आहेत. युवक तसेच महिला माता-भगिनींनी या दहीहंडीचा आनंद घ्यावा असे आवाहन आ. श्वेताताई महाले तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
