■ महापुरुष हे आपले आदर्श व स्वाभिमानाचे प्रतीक : नरेश शेळके
बुलढाणा, २७ ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जागतिक कीर्तीचे युगपुरुष आहेत. त्यांनी जगातील पहिले अलौकिक, आदर्श रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांचा मालवण, सिंधुदुर्ग येथील आठ महिने अग- ोदर पंतप्रधानांच्या हातून उद्घाटन केलेला पूर्णाकृती पुतळा कोसळला ही फार निंदनीय घटना आहे. आपले सर्वच महापुरुष व राष्ट्रसंत हे आदर्श व स्वाभिमानाचे प्रतीक आहेत असे मत नरेश शेळके, जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या नेतृत्वात २७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदन प्रसंगी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने दिनांक २६ ऑगस्ट २०२४ मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील अवघ्या आठ महिने अगोदर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातून उद्घाटन झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, या घटनेचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत शासनाला निवेदन दिले. निवेदनामध्ये पुतळा बांधकामात झालेल्या भ्रष्टाचार व शासन निकषांचे पाय मल्ली करणाऱ्यावर त्वरित कठोर कारवाई करावी व अलीकडच्या काळात महाराष्ट्र राज्यात बांधलेल्या सर्व महापुरुष व राष्ट्रसंतांचे पुतळे, स्मारके निर्माण झालेली असतील या सर्वांचे शासनाने स्ट्रक्चरल ऑडिट करावे व त्यांची कोसळला, या घटनेचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत शासनाला निवेदन दिले. निवेदनामध्ये पुतळा बांधकामात झालेल्या भ्रष्टाचार व शासन निकषांचे पाय मल्ली करणाऱ्यावर त्वरित कठोर कारवाई करावी व अलीकडच्या काळात महाराष्ट्र राज्यात बांधलेल्या सर्व महापुरुष व राष्ट्रसंतांचे पुतळे, स्मारके निर्माण झालेली असतील या सर्वांचे शासनाने स्ट्रक्चरल गुणवत्ता शासन निकषाचे पालन झाले किंवा नाही याची खातिरदारी करावी, जेणेकरून परत महाराष्ट्रात कुठे अशा दुर्दैवी घटना होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. निवेदनात जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके यांच्यासह महासचिव बीटी जाधव, जिल्हा उपाध्यक्ष पी एम जाधव, सुमित सरदार, भगवानराव शेळके, सईद इकबाल, तालुका अध्यक्ष तुळशीराम काळे, शहराध्यक्ष अनिल बावस्कर, गजानन भिवसनकर, गणेश कोरके, शंकर महाराज, सुजित देशमुख, विनोद गवई, संदीप बोर्डे, सतीश बर्डे, संजय शिरसाट, मनोज चंदन, पंजाबराव राऊत, रवींद्र तोडकर, यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.