दारू पिवून पत्नीच मारहाण केली, पती झोपल्यानंतर पत्नीने अंगावर रॉकेल घेत जाळून घेतले व यामध्ये पत्नी मरण पावली याप्रकरणी आरोपी पतीस 3 वर्षे सश्रम कारावास व 2 हजार दंडाची शिक्षा किन्होळा ता. चिखली जि. बुलडाणा येथील सौ. अर्चना व अमोल वाघमारे वय 21 वर्षे, हिला पती अमोल देविदास वाघमारे हा सतत दारू पिवून पैश्यांची मागणी करणे व न दिल्यास मारहाण करणे अश्या प्रकारचा त्रास देत असल्याकारणाने त्या त्रासाला कंटाळुन अर्चना हिने 20 जुलै 2016 रोजी स्वतःला जाळुन घेवुन आत्महत्या केली त्या प्रकरणी बुलडाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील सी. खटी यांनी आरोपी अमोल वाघमारे यास 3 वर्षे सश्रम कारावास व 2 हजार रू. दंड, दंड न भरल्यास 3 महीने सश्रम कारावास अश्या प्रकराची शिक्षा 28 ऑगस्ट 2024 रोजी सुनावली. मयत अर्चना व आरोपी अमोल यांचा घटनेच्या 7 ते 8 वर्षापुर्वी विवाह झाला होता. परंतु, आरोपी अमोल दारू पिण्याच्या सवयीचा असल्यामुळे तो सतत अर्चना हिला दारू पिण्यासाठी पैश्यांची मागणी करायचा व पैसे न दिल्यास मारहाण करायचा. आरोपींच्या या नेहमीच्या त्रासाला कंटाळुन अर्चना घटनेच्या 2 महीनेपुर्वी माहेरी निघुन गेली होती. परंतु, दोन छोटया मुलांचा विचार करून परत पती समवेत नांदण्यास किन्होळा येथे आली होती. 20 जुलै 2016 रोजी दुपारी 2 वाजता आरोपी हा दारू पिवुन घरी आला व तु दोन महीनेपुर्वी माहेरी का गेली होती. या कारणावरून अर्चना हिला बेदम मारहाण केली. त्यामुळे अर्चना हिने घरातील रॉकेल अंगावर ओतुन घेतले त्यावेळी अमोल हा अर्चनाला तुला मरायचे असेल तर आताच मर असे म्हणुन झोपी गेला तेव्हा अर्चनाने स्वतःला पेटवुन घेतले. मयत अर्चनाचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर शेजारीपाजारी लोकांनी व पतीने तिला सरकारी दवाखाना, बुलडाणा येथे भरती केले. परंतु, अर्चना हि 85 टक्के जळाली असल्याकारणाने रात्री 11.55 वाजता अर्चनाचा मृत्यु झाला. मृत्युपुर्वी सरकारी दवाखाना बुलडाणा येथे मयत अर्चनाचे नायब तहसीलदार व सहा. पोलीस निरीक्षक, बुलडाणा शहर या दोघांनी मृत्युपुर्व बयान नोंदविले होते. त्यावेळी ’माझ्या या स्थितीला माझे पतीच जबाबदार आहेत असे स्पष्टपणे सांगितले होते’.
सदर घटनेची तक्रार मयत अर्चनाचा भाउ समाधान बबन पाटील यांनी 21 जुलै 2016 रोजी चिखली पोलीस स्टेशनला दाखल केल्यानंतर आरोपी अमोल वाघमारे यांचे विरूध्द भा.द.वी चे कलम 306, 498- 3 प्रमाणे अपराध क्रमांक 341/2016 दाखल करण्यात येवुन तपासाअं आरोपी विरूध्द दोषारोप पत्र संबंधीत न्यायालयात दाखल करण्यात आले.
सदर प्रकरण चालविणेकामी बुलडाणा येथील जिल्हा न्यायालय वर्ग करण्यात आले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकुण 12 साक्षीदारांच साक्षीपुरावे नोंदविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी अफसान तबसुम आरीफखान नायब तहसीलदार जी. टी. माळी व सहा. पोलीस निरीक्षण विकांत पाटील, तपास अधिकारी सुगत पुंडगे, प्रल्हाद मदन या साक्षीदारांच्या साक्षी घटनेच्या अनुषंगाने एकमेकांशी सुसंगत व एकमेकांना पुरक व अतिशय महत्वाच्या ठरल्या. या साक्षीपुराव्याच्या आधारे व अभियोग पक्षातर्फे खटल्याच्या अनुषंगाने न्यायालया समोर आणल्या गेलेल्या महत्वाच्या बाबी विचारात घेत विद्यमान न्यायालयाने वरील प्रमाणे शिक्षा आरोपीस सुनावली. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. सोनाली सावजी देशपांडे यांनी अतिशय प्रभावीपणे, कौशल्यपूर्णपणे सरकारी पक्षाची बाजू वि. न्यायालयासमोर मांडल्याकारणाने त्याच्या आधारे व त्यांनी केलेला प्रभावी युक्तीवाद ग्राहय धरून वि. न्यायालयाने आरोपीला भा.द.वी चे कलम 498 अन्वये दोषी धरून वरील प्रमाणे शिक्षा सुनावली. तर सदर प्रकरणात त्यांना पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदाराम इंगळे बक्कल नं. 667 यांनी सर्वतोपरी सहकार्य केले.