बुलढाणा, ३० ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : आज महारोजगार मेळावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड. संजय राठोड यांनी जिजामाता प्रेक्षागार येथे आयोजित केला होता. या महारोजगार मेळाव्यात हजारो तरूणांना मल्टीनॅशनल कंपन्यांचे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी मुकुल वासनिक यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अॅड. संजय राठोड यांनी कुठीलच अपेक्ष न ठेवता ते संघटनेचे असो व कुठले ही काम करत राहतात. तरूणांच्या हितासाठी सदैव तत्पर असतात. आज रोजगार मेळावा आयोजीत करणे हा त्याचाच एक भाग आहे. देशात ९.३ टक्के रोजगारीचा दर वाढलेला आहे. जो मागच्या काळात ६.३ टक्के होता आज तो दर आज ३ टक्केने वाढला आहे. गुजरात मध्ये जेव्हा रोजगार भरतीचा मेळावा झाला तेव्हा चेंगराचेंगरी झाली. यामध्ये काहींच्या जीवीताला हानी झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी २ कोटीच्या रोजगाराची हमी दिली होती. परंतू आज रोजगारीचा दर वाढत चाला आहे. आज महाराष्ट्रात प्रत्येक दिवसाला बेरोजगार तरूण आत्महत्या करत आहे. यावेळी अॅड. संजय राठोड यांनी रोजगार महामेळावा आयोजित केला त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. अॅड. संजय राठोड यांनी आलेल्यांचे स्वागत केले. युवकांना योग्य विचार आणि दिशा देणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. रोजगाराची समस्या भीषण असतांना याबाबत अॅड. संजय राठोड यांनी महारोजगार मेळावा घेऊन हजारो तरूणांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. तसेच ज्या तरूणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यांनी अॅड. संजय राठोड यांचे आभार सुध्दा मानले आहे. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव खा. मुकुल वासनिक, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, आ.राजेश एकडे, नाना गावंढे, रेखाताई खेडेकर, मुक्त्यारसिंग राजपूत, श्याम उमाळकर, राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, अॅड. जयश्रीताई शेळके, दिपक काटोले, अॅड.गणेशसिंग राजपूत, विजय अंभोरे यांच्यासह काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते तसेच तरूणांची मोठ्या – संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे औद्योगीक सेलचे प्रदेशाध्यक्ष हेमंत सोणारे, व प्रदेश उपाध्यक्ष विशाल बावस्कर यांच्याव्दारे करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येत युवकांनी सहभाग दर्शविला.