spot_img

माजी जिल्हा शल्य चिकित्सकांचा सुपुत्र सेवानिवृत्त होत आहे!

बुलढाणा, ३१ ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : ज्यांनी जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय सावंगी मेघे याठिकाणी वैद्यकीय शिक्षणाचे धडे दिले.. ज्यांच्या पुस्तकातून वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यास केला आणि जे या बुलढाण्याला जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून लाभले, असे गुरुवर्य डॉ. डी. के. कडासणे यांचे सुपुत्र आणि जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासणे आज सेवानिवृत्त होत आहे, त्यांचा सन्मान आणि सत्कार करणे आद्यकर्तव्य असल्याच्या भावनेतून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी एस.पी. कडासणे यांचा कौटुंबिक सन्मान केला. विशेष म्हणजे हा सन्मान सोहळा जिल्हा शल्य चिकित्सकांसाठी आरक्षित असलेल्या शासकीय बंगल्यावर झाल्याने कडासणे कुटूंबियांच्या ४८ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळाला होता. पोलिस अधीक्षक सुनिल कडासने आज सेवानिवृत्त होत आहे. त्यांची बुलढाण्याशी एक नाळ जुळलेली आहे. पोलिस अधीक्षक सुनिल कडासणे यांचे वडील हे बुलढाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक राहिलेले आहेत. डॉ.डि.के. कडासणे हे १४ जून १९७६ ते २४ एप्रिल १९७९ पर्यंत ते बुलढाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक होते. त्यामुळे एसपी कडासणे यांचे बालपण आणि माध्यमीक शिक्षण बुलढाण्यातील एडेड हायस्कूल मध्ये झाले होते. आज पोलिस अधीक्षक सुनिल कडासणे यांच्या सेवानिवृत्ती बद्दल वर्तमान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी त्यांना त्याच शासकीय निवासस्थानी आमंत्रित केले होते, ज्या ठिकाणी सुनिल कडासणे यांचे बालपण गेले होते. त्यांच्या मातोश्री आरतीताईंना सुद्धा या निवासस्थानाच्या आठवणींनी गहिवरून आले. पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांचा याच वास्तूत सत्कार करण्यात आला. सुनिल कडासने हे तीन वर्ष त्या वास्तूत राहिल्यामुळे त्यांचे मन भरून आले होते आणि भूतकाळातील त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. विशेष म्हणजे याठिकाणाहून बदलून गेल्यानंतर सुनिल कडासने थेट पोलिस उपअधीक्षक बनून बुलढाण्यात दाखल झाले होते. ते मलकापूर येथे पोलिस उपविभागीय अधिकारी म्हणून सुद्धा कार्यरत होते. या सर्व कारणांमुळे पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांची बुलढाण्यातील विविध लोकांशी सुध्दा नाळ जुळलेली आहे. याप्रसंगी श्री कडासणे यांच्या पत्नी साक्षी कडासने, दोन्ही मुले तसेच डॉ भागवत भुसारी यांचे आई-वडील तसेच डॉ. प्रशांत पाटील उपस्थित होते.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत