बुलढाणा, 3 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) :- बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील कॅच मेट भागात पाऊस पडत असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदी ही धुतडी भरून वाहत असल्याने खडकपूर्णा धरणात ही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या 92 टक्के धरण भरल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आले आहे. खडकपूर्णा नदीकाठच्या 33 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच धरण क्षेत्रातील काही गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. या धरणाचे 19 दरवाजे 0.50 मीटरने उघडण्यात आले आहे. धरणात पाण्याची होणारी आवाक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
यामध्ये टाकरखेड भागिले,निमगाव गुरू, सावंगी टेकाळे, साठेगाव, दिग्रस खुर्द, निमगाव वायाळ, हिवरखेड, राहेरी खु. राहेरी बु., ताडशिवनी, देवखेड, किर्ला, दुधा, सासखेड, लिमखेडा, हनवंतखेडा, उसवद, वझर भामटे, सायखेड, डिग्रस बु., टाकरखेड वायाळ, तडेगाव, पिंपळगाव कुडा, लिंगा, खापरखेडा, सावरगाव तेली, वाघाळा टाकरखोपा इंचा, कानडी, देवठाणा, रायगाव, धानोरा बंजारा या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
गुड इव्हिनिंग सिटी आपल्या वाचकांना खडकपूर्णा धरणाची या क्षणाची स्थिती जाणून घेण्यासाठी नुकताच 11.10 वाजता काढलेला फोटो दर्शविला आहे.

