बुलढाणा, 14 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने विविध जिल्ह्यांतील न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. यामध्ये बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश स्वप्निल खटी यांचा ही समावेश आहे.बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश स्वप्निल खटी यांची बदली उस्मानाबाद (धाराशिव) येथे झाली. त्यांनी जवळपास साडे तीन वर्ष बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कामकाज पाहिले. त्यांच्या बदलीनंतर दादर नगर हवेली व दमन दिव चे प्रमुख न्यायाधीश एस एम भोसले यांची बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश स्वप्निल खटी यांच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे भुमीपूजन मागील महिन्यात पार पडले. आर एन जोशी रजिस्टर जनरल यांच्या स्वाक्षरीने बदली बाबतचे पत्रक काढण्यात आले आहे.