जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांचा आदेश
बुलढाणा, 15 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) :- श्रीगणेशोत्सव कालावधीत विर्सजन मिरवणूकीमध्ये प्रखर बिम लाईट व लेझर बिम लाईट वापरण्यावर बंदी घालण्याचा जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी घेतला आहे. त्यासंदर्भातील आदेश पारित करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्हयात दिनांक 7 सप्टेंबर ते दिनांक 17 सप्टेंबर या कालावधीत श्रीगणेशोत्सव साजरा होत असून या पार्श्वभूमीवर जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही व सार्वजनिक श्रीगणेशोत्सव शांततेत पार पडावा तसेच पर्यावरण पुरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यात यावा या करीता खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच श्रीगणेशोत्सव कालावधीत विसर्जन मिरवणूकीमध्ये वापरण्यात येणार्या वाद्यामध्ये प्रखर बिम लाईट व लेझर बिम लाईट चा वापर केल्याने पर्यावरणाची हानि व मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच प्रखर बिम लाईट व लेझर बिम लाईट या मूळे श्रीगणेश विसर्जन मिरवणूकीमधील समाविष्ट असणारे भक्तगण तसेच विर्सजन मिरणवणूक पाहणार्या लोकांचे डोळे दिपुन दुर्घटना होण्याची व कायमस्वरूपी अंधत्व येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामूळे श्रीणेशविसर्जन मिरणवणूक मधील वादयांवर प्रखर बिम लाईट व लेझर बाबत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 प्रमाणे निर्बंध लावणे आवश्यक असल्याचे पोलीस अधिक्षक, बुलढाणा यांनी प्रस्तावीत केले आहे.
त्यामुळे श्रीगणेशोत्सव कालावधीत विसर्जन मिरवणूकीमध्ये वापरण्यात येणार्या वादयामध्ये प्रखर बिम लाईट व लेझर बिम लाईट चा वापर केल्याने पर्यावरणाची हानी व मानवी आरोग्यास धोका निर्माण होवू शकतो.
त्याअर्थी, पोलीस अधिक्षक, बुलढाणा यांनी प्रस्तावीत केल्यानुसार डॉ.किरण पाटील, जिल्हादंडाधिकारी, बुलढाणा भारतीय नागरीक संहीता-2023 चे कलम 163 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून श्रीगणेशोत्सव कालावधीत विर्सजन मिरवणूकीमध्ये प्रखर विम लाईट व लेझर बिम लाईट वापरण्यावर प्रतिबंध करण्यात येत आहे असे जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.