spot_img

काँग्रेसच्या कालच्या ठिय्या आंदोलनावर पोलिसांचा पलटवार

बुलढाणा, 17 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) :- आ.संजय गायकवाड यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे निषेधार्थ 4 वा दरम्यान बुलढाणा पोलिस स्टेशन मध्ये आ.गायकवाड यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकार्‍यांच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन  आमदारांसह इतर काँग्रेस पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते अचानक पोलीस स्टेशन बुलडाणा शहर येथे आले व आ.संजय गायकवाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा याकरिता पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये त्याचप्रमाणे ठाणेदार यांचे दालनामध्ये राहुल गांधी जिंदाबाद, संजय गायकवाड मुर्दाबाद, संजय गायकवाड यांचे वर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, सरकार हमसे डरती है पोलीस को आगे करती है. होश मे आव होश मे आब, पोलीस प्रशासन होश मे आव अश्या प्रकारे व इतर घोषणाबाजी करून पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या मांडुन 8.30 वाजेपर्यंत आंदोलन केले.
जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे आदेशवरून 6 सप्टेंबर अन्वये दिनांक  9 सप्टेंबर  ते 23 सप्टेंबर पर्यंत संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये मुंबई पोलीस कायदा सन 1951 चे कलम 37 (1) (3) मपोका लागू करण्यात आलेला असुन त्याव्दारे जमाव एकत्र जमवीणे व इतर बरेच निबर्ंध लागू करण्यात आलेले आहेत, असे असतांनाही 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 ते रात्री 8.30 वा दरम्यान काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कोणत्याही प्रकारची पुर्वसुचना न देता व प्रशासनाची कोणत्याही प्रकारची पुर्वपरवानगी न घेता अचानकपणे पोलीस स्टेशन बुलडाणा शहर याठिकाणी एकत्र येवून घोषणाबाजी करुन ठाणेदार यांचे दालनात ठीय्या आंदोलन केले.
त्यामुळे जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन एकत्र जमाव जमवुन पोलीस स्टेशनला येवुन घोषनाबाजी केल्या मुळे विदर्भ प्रभारी काँग्रेस पार्टी व मध्य प्रदेशाचे माजी आमदार कुनाल चौधरी, आ.धिरज लिंगाडे  आ.राजेश एकडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्र, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, सुनिल सपकाळ , संजय पांढरे, दत्ता काकस, मीनल ताई आंबेकर, जयश्रीताई शेळके, स्वातीताई वाकेकर, मंगलाताई पाटील, हरीश रावळ, भगवान धांडे, गजानन मामुलकर, भूषण मापारी, साहेबराव पाटील, रिजवान सौदागर, अनिल सावजी, रामभाऊ जाधव, डॉ.अरविंद कोलते, अतुल शिरसाट,  श्याम उमाळकर, लक्ष्मणराव घुमरे, समाधान पुंडलिक दामधर, विजय अंभोरे, अ‍ॅड.संजय राठोड, मोहम्मद आसिफ इकबाल तफुड्झुल हुसेन, एकनाथ चव्हाण, आश्विन जाधव, डॉ.ईसरार अहमद,  शेख मोहसिन शेख अन्सार  व इतर 50 ते 60 कार्यकर्त व पदाधिकारी यांच्यावर कलम 135 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत