बुलढाणा, 18 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) :- बुलढाणा राज्य परिवहन महामंडळात 2018 ते 2021 पर्यंत विभाग नियंत्रक म्हणून कार्यभार सांभाळलेले संदीप रायलवार यांना 10 हजारांची लाच स्विकारताना अटक करण्यात आले आहे. सध्या राज्य परिवहन महामंडळाचे वर्धा विभाग नियंत्रक संदीप रायलवार अँटी करप्शनच्या जाळयात अडकला आहे. मेकॅनिक विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला पुळगाव येथे विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी बदली करीता 20 हजाराची मागणी केली होती. वर्धा येथील राज्य परिवाहन महामंडळातील शिपाई प्रकाश दाबेकर यांच्या मार्फत लाचेची मागणी केली होती. ॲंटी करप्शन ब्युरोने सापळा रचून त्याला 10 हजाराची लाच स्विकरातांना ताब्यात घेतले. त्या दोघांवर रामनगर येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. संदीप रायलवार हा छ.संभाजीनगर येथे विभागीय अधिकारी म्हणून ही कार्यरत होता.