लाडके आयोजकांचे अक्षम्य दुर्लक्ष
बुलडाणा, २१ सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : शहरात नुकताच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा भव्य-दिव्य शासकीय कार्यक्रम झाला. ज्यावर भव्य दिव्य खर्चही करण्यात आला. परंतु कार्यक्रमामुळे तयार झालेला भव्य-दिव्य कचरा अजूनही उचलण्यात आलेला नाही. परिणामी सामान्य नागरिकांना यांचा भयंकर त्रास होत असून जिजामाता प्रांगणात पडलेली उष्टावळे डोकं भणकवत आहेत. या मैदानावर दररोज मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या माऊली ग्रुप आणि गुड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी आज सकाळपासून जवळपास २० पोतडी कचरा भरून मैदान स्वच्छ केले. कचरा उचलण्याची जबाबदारी असलेल्यानप्रति यावेळी शेकडो लोकांनी रोष व्यक्त केला.बुलढाणा शहरात नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे येऊन गेलेत निमित्त होते ते लाडकी बहीण योजना व शहरातील विविध महात्म्याचे स्मारकांची उद्घाटने या निमित्त शहरात जिल्हा भराचे कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होते त्यांना त्यांच्या वाहन पार्किंगसाठी जिजामाता कॉलेजचे मैदान उपलब्ध करून देण्यात आले होते या ठिकाणी सर्वच वाहने जमा होते. त्यांना त्याच ठिकाणी अन्नाची पाकिटे देण्यात आली. परंतु दुसऱ्या दिवशी मात्र मैदानावर संपूर्ण ठिकाणी अन्नाची पाकिटे उघड्यावर पडली होती. ही पडलेली अन्नाची पाकिटे संपूर्ण परिसरात दुर्गंधी निर्माण करत होती. बुलढाणा शहरातील माऊली ग्रुप व गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य सुधाकर मानवतकर, मोहन दलाल, सुधीर भालेराव, राजेंद्र वानेरे, शंकर लोखंडे, कैलास मोरे, योगेश भांगडभट्टी, श्रीकांत जोशी, संजय कस्तुरे, बर्डे पाटील, सुरडकर, भोसले, मोरे आदींनी जिजामाता कॉलेजच्या मैदानावर नुकतेच पार पडलेल्या मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या कार्यक्रमानिमित्त शहरात ठीक ठिकाणी वाहने जमा करून वाहत चालक व लाडकी बहिणीची उपासमार होऊ नये म्हणून त्यांना ठीक ठिकाणी अन्नदान देण्यात आले परंतु जास्तीचे अन्न त्यांनी आहे तिथेच टाकून निघून गेले त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी सुटली होती. दोन दिवस उघडे पडलेले अन्न बऱ्यापैकी खराब झाले होते. त्यामुळे पहाटेच्या वेळी मैदानावर येणारे वयोवृद्ध, भरतीची प्रॅक्टिस करणारी तरुण मुले, काही शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना त्याचा त्रास होत होता परंतु स्वच्छतेसाठी कुणीच पुढे आले नाही. आज कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग ग्रुप बुलढाणाचे सदस्य यांनी संपूर्ण परिसरात पडलेलेअन्नाची उष्टावळे उचलून एक सामाजिक दायित्व पूर्ण केले. यावेळी काही महिलांनी सुद्धा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.