लाडक्या बहिणीचे पैसे बँकांनी वळवले अटल पेंशन योजनेत
बुलढाणा, २५ सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. या योजनेतून प्रत्येक महिलेच्या खात्यात दीड हजार रुपये जमा केले जात आहे. मात्र अजूनही अनेक महिलांना याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे आम्ही लाडक्या नव्हे तर सावत्र बहिणी असल्याची टीका या महिलांकडून केली जात आहे. राज्य शासनाने दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना सुरू केली. या योजनेतून दरमहा महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा केली जातील, अशी घोषणाही केली. त्यानुसार रक्षाबंधणादरम्यान जिल्ह्यातील काही महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रमही याच कालावधीत पार पडला होता. त्यावेळी काही महिला लाभार्थ्यांना प्रत्यक्ष या योजनेचा लाभही देण्यात आला. परंतु, अजूनही अनेक महिलांना या योजनेतून पैसे मिळालेले नाही. त्यांनी विविध सायबर कॅफेवर जावून तपासणी केली. मात्र पैसे कोणत्या बँक खात्यात जमा झाले, हे कळायला मार्गच नाही. अन्य महिलांच्या खात्यात पैसे आले पण आपल्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याने नाराजीचा सूर आहे. तसेच आम्ही लाडक्या नाही तर सावत्र बहिणी आहे, त्यामुळेच आमच्या खात्यात सरकारने पैसे जमा केले. नसल्याची ओरड महिला करीत आहे. एकूणच या सर्व प्रकारामुळे योजनेच्या लाभात दुजाभाव झाल्याचे बोलले जात असून, शासनाने प्रतीक्षेतील महिलांच्या खात्यात पैसे जमा करावे, अशी मागणी होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्कळ बँकांना यबाबत आदेश देऊन अटल पेंशन योजनेत पैसे न कापून घेता त्या लाडक्या बहीणींना ते पैसे मिळावे अशी मागणी लाडक्या बहीणी करीत आहेत. यावर प्रशासन काय कार्यवाही करते ते येणाऱ्या कालवाधीत स्पष्ट होईल. प्रशासनानाकडून ताकीद दिली असतांनाही बँका यास्वरूपाचे काम करीत आहे. त्यामुळे प्रशासनाकडे लक्ष लागून राहिले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यातच जमा करण्यात आले आहे. अनेक महिलांचे लग्नापूर्वीचे बँक खाते माहेरी काढलेले आहे. याच खात्यात सदर योजनेची रक्कम जमा करण्यात आली. त्यामुळे महिलांना पैसे काढण्यासाठी माहेरची वारी करावी लागत आहे. सव्र्व्हर डाउनमुळे अनेक महिलांचे पैसे जमा झाले की नाही हे देखील स्पष्ट झाले नाही. त्यामुळे महिलांची प्रतीक्षा कायम आहे.
लाडक्या बहीणीचे पैसे अटल पेंशन योजनेत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना १५०० रूपये प्रत्येक महिन्याला मिळत आहे. परंतू काही बँकांनी त्या महिलांचे परस्पर अटल पेंशन योजना त्यांच्या खात्याला लागू केल्याने लाडक्या बहीणांना पैसे मिळत नाही. अनेक लाडक्या बहीणींनी राष्ट्रीयकृत बँकेत खाते काढले आहे. त्यांना न विचारातच त्यांच्या खात्यात अटल पेंशन योजना लागू केल्याने त्याचे पैसे खात्यातून वळती केल्या जाते. हा प्रकार महिलांच्या लक्षात येऊ नाही. म्हणून अनेक बँकांनी पासबुक एंन्ट्रीचे मशीन बंद करून ठेवले आहे. त्यामुळे पैसे कुठे गेले हे ही शोधता येणे कठीण झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात काही तरी कार्यवाही करावी अशी मागणी लाडक्या बहीणी करीत आहेत.