आ. संजय गायकवाड यांचे नेतृत्व… जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन आणि मुख्याधिकारी श्री पांडे यांची कार्यकुशलता
बुलढाणा, 28 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) :- बुलढाणा शहर हे तसे थंड हवेचे ठिकाण आहे. बुलढाणा शहर अजिंठ्यांच्या पर्वतरांगेवर वसलेले असल्यामुळे शहराला थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख निर्माण झाली. परंतू वाढत्या वृक्षतोडीमुळे ती ओळख पुसते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतू आ. संजय गायकवाड यांचे नेतृत्व आणि बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या प्रयत्नातून बुलढाण्यात मोठ्याप्रमाणात वृक्षलागवड तर झालीच परंतू त्याचे संवर्धन सुध्दा करण्यात आले आहे. बुलढाणा नगर परिषदेला या आधी सुध्दा माझी वसुंधरा अभियान 2.0 व 3.0 या अभियानात प्रथम क्रमांकाचे परिातोषीक मिळाले आहे.
माझी वसुंधरा अभियान राज्यातील स्थानिक स्वाराज्य संस्थांमध्ये दिनांक 1 एप्रिल ते 31 मे 2024 च्या कालावधीत ‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ अभियान राबविण्यात आले यामध्ये बुलढाणा नगर परिषदेने सहभाग घेतला होता. या अभियानात बुलढाणा नगर परिषदेने अमरावती विभागातून प्रथम क्रमांक पटकविला आहे. या बद्दल नगर परिषदचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत मिळालेली रक्कम हरितपट्टेविकासआणिपर्यावरण पूरक कामांसाठी शासननिर्णयानुसार खर्च करावी लागणार आहे. यासाठी नगर परिषदेचे खूप खूप अभिनंदन. मिळणार्या रकमेतून हरितपट्टे विकसित करून बुलढाणा शहराची थंड हवेचे ठिकाण म्हणून असलेली ओळख पुन्हा निर्माण करू. पुढील वर्षी राज्य स्तरावर 5.0 अंतर्गत राज्यस्तरावर येण्याचा शर्थीने प्रयत्न करू आ.संजय गायकवाड
बुलढाणा विधानसभा मतदार संघ