‘मेडीकल कॉलेजचे श्रेय कुणा एकट्याचे नव्हे तर सर्वांचे’
बुलढाणा, १ ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : सरकारच्या मोदी तिसऱ्या कार्यकाळाला शंभर दिवस पूर्ण झाले आहे. त्या निमित्ताने बुलढाणा येथे प्रता- पराव जाधव केंद्रिय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्रप्रभार) यांनी पत्रकार परिषद अयोजित केली होती. केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांच्याशी संबधीत आयुष व आरोग्य, कुटूंब कल्याण खात्याबद्दल माहिती दिली. देशात अनेक वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरात देण्यात आली आहे. सर्व भारतात ऑल इंडीया आयुर्वेदा इंस्टियूटची स्थापना करण्यात येणार आहे. देशात सर्वप्रथम दहा ऑल इंडिया आयुर्वेदा इंस्टियूटची स्थापना करण्यात येईल. ‘देश का प्रकृती अभियान’ सर्व भारतभर राबविण्यात येणार आहे. यामध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील बदलांची माहिती अॅपमध्ये टाकण्यात येणार आहे. प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे. त्याच्या उंचीप्रमाणे त्याचे वजन किती असावे, त्याने आहाराचे संतुलन कसे ठेवावे असे विविध उपाय यामध्यमातून करण्यात येणार आहे. बुलढाण्यातील नागरिकांना महागडी व दर्जेदार औषधी २० ते ३० टक्के किंमतीत मिळावी यासाठी बुलढाण्यात ‘अमृत स्टोर’ जिल्हा सामन्य रुग्णालयात उघडण्यात येणार आहे. त्याबाबत मंजुरात सुध्दा मिळाली आहे. बुलढाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अॅडमिशन लवकरात लवकर सुरू होणार आहे. पुर्ण क्षमतेने मेडीकल कॉलेज सुरू होईल असा अशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. बुलढाण्याच्या मेडीकल कॉलेजसाठी कुणा एकाचे हे श्रेय नाही. यासाठी सर्वच आजी माजी लोकप्रतिनिधीनी प्रयत्न केले आहे. यासाठी कुठल्याच लोकप्रतिनिधीने विरोध केला नाही. पीक वीमा शेतकऱ्यांना मिळत आहे. यामध्ये कुणाचे श्रेय नाही. यासाठी निसर्ग जबाबदार आहे. शेतकऱ्याचे मालाचे पीक विम्याने नुकसान केल्यामुळेच पीक वीमा शेतकऱ्यांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या कालावधीत शेतीमध्ये सुध्दा औषधी उपयोगी पीक घेऊन यामध्यमातून शेतकऱ्यांना फायदा होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. बुलढाणा लोकसभेमध्ये सिंदखेड राजा, बुलढाणा चिखली, मेहकर या मतदारसंघात कमी पडलो. तरी गेल्या ३५ वर्षाचा राजकीय अनुभव असल्याने लोकसभेची उणीव भरून काढून येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचे आमदार निवडून आणू असा अशावाद केंद्रिय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी याप्रसंगी व्यक्त केला.