बुलढाणा, ५ ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : केंद्रीयमंत्री प्रता- पराव जाधव यांनी बुलढाण्यासह राज्यातील आठ वैद्यकीय महाविद्यालयाला प्रवेशित मान्यता प्रदान करून दिल्यानंतर राज्य शासनाने सुद्धा प्रथम वर्षाकरिता १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशला परवानगी दिली आहे या संदर्भातील शासन निर्णय ४ ऑक्टोंबरला निर्गमित झाला आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली अंतर्गत मेडिकल असेसमेंट अँड रेटीग बोर्ड यांनी राज्यातील आठ वैद्यकीय महाविद्यालयाला सन २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएस प्रवेशाला मंजुरात प्रदान केली. यामध्ये बुलढाणा येथील वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश होता त्यानुसार बुलढाणा येथील वैद्यकीय महाविद्यालयास प्रथम वर्षाकरिता १०० विद्यार्थी प्रवेश परवानगी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य द्रव्य विभागाच्या वतीने प्रदान केली आहे १०० विद्यार्थी प्रवेश परवानगी देण्यासंदर्भातील शासन निर्णय ४ ऑक्टोंबरला निर्गमित केला आहे.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली कृतज्ञता
केंद्र सरकारच्यावतीने महाराष्ट्रातीलआठ वैद्यकीय महाविद्यालयांना प्रत्येकी १०० याप्रमाणे ८०० एमबीबीएस प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रवेश प्रदान करण्यासंदर्भाचे परिपत्रक ३० सप्टेबरला निर्गमित केले आहे त्यानंतर राज्यातील जनतेच्या हितासाठी कटिबद्ध असलेल्या वेगवान सरकारने तीनच दिवसात एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला मान्यता देणारा शासन निर्णय निर्गमित केला त्यामुळे आता राज्यात पूर्वीच्या एमबीबीएस प्रवेश क्षमतेत ८०० वाढ होऊन विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळणार आहेत त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे पी नड्डा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रति केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.