बुलढाणा, ९ ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : याला म्हातारचळ नाही तर काय म्हण- णार, जेव्हा ८१ वर्षांचा थेरडा ९ वर्षाच्या लहानग्या मुलीचा विनयभंग करतो! जिल्हा न्यायालयाने या म्हाताऱ्याला ५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. सोबतच ५ हजार रुपयांचा दंडही भरण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. सदर प्रकरणात विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री यांनी केलेला प्रखर युक्तीवाद आरोपीला कारागृहात पाठविण्यात महत्वाचा ठरला. घटना दिनांक ३१ मार्च २०१९ रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान आरोपीच्या शेतामध्ये घडली. पिडीत मुलगी वय वर्ष ९ ही तिच्या शेतामध्ये बकऱ्या चारत असतांना आरोपी भागाजी लक्ष्मण नरवाडे वय ८१ वर्षे राहणार मासरूळ, ता. जि. बुलढाणा याने चिंच खाण्यासाठी पिडीत मुलीला त्याच्या शेतामध्ये बोलावून चिंचेच्या झाडाखाली लोखंडी पलंगावर तिला झोपवून तिला अंगाशी आवळून गैरवर्तन केले. सदरची बाब पिडीत मुलीने सर्वप्रथम तिच्या आईला सांगीतली व नंतर सदरची घटना ही तिच्या आईसमोर वडिलांना सुध्दा सांगीतली वरून पिडीताचे वडिल यांनी पोलीस स्टेशन घाड येथे आरोपीविरूध्द तकार दिली. वरून पोलीस स्टेशन धाड यांनी आरोपीविरूध्द कलम ३५४, ३५४ अ, भादंवि सहकलम ७ व ८ पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. सदर गुन्हयाचा तपास पोनि प्रदिप ठाकूर यांचेकडे देण्यात आला. तपासामध्ये आरोपीविरूध्द पुरावा मिळून आल्यामुळे दोषारोपपत्र विशेष न्यायालय, बुलढाणा येथे दाखल करण्यात आले. सदरचे प्रकरण सरकार पक्षातर्फे चालविण्याकरिता विशेष सरकारी वकिल अॅड. संतोष खत्री यांचेकडे सोपविण्यात आले. त्यांनी सदर प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे एकुण ७ साक्षीदार तपासले. विशेष सरकारी वकिल संतोष खत्री यांनी न्यायालयासमोर नोंदविलेल्या पुराव्या माध्यमातून पिडीता ही अल्पवयीन असल्याची विशेष सरकारी वकील तसेच आरोपीने पिडीतेचा विनयभंग केला असल्याची बाब न्यायालयासमोर सिध्द केली. विशेष न्यायाधीश आर.एन. मेहरे यांनी सदरचे पुरावे ग्राह्य धरून आरोपीविरूध्द गुन्हा सिध्द होत असल्याचे मत मांडले. सदर प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील संतोष खत्री यांनी न्यायालयासमोर उपलब्ध असलेल्या पुराव्याबाबत प्रखर युक्तीवाद केला वरून विशेष न्यायाधीश आर.एन. मेहरे यांनी आज दिनांक ९ ऑक्टोबर रोजी आरोपी भागाजी लक्ष्मण नरवाडे वय ८१ वर्षे राहणार मासरूळ यास दोषी ठरवून कलम १० वाचनीय कलम ९ (एम) पोक्सो कायद्यानुसार ५ वर्षाचा सश्रम शिक्षा तसेच रूपये ५ हजार दंड आरोपीस ठोठावला. दंड न भरल्यास चार महिने साध्या कारावासाची शिक्षा सुध्दा ठोठावली. सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री बुलडाणा यांनी कामकाज पाहिले. त्यांना कोर्ट पैरवी पोउपनि रमेश चव्हाण पोलीस स्टेशन धाड यांनी सहकार्य केले.