बुलढाणा, २२ ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : रास्त भाव दुकानांतून धान्य उचलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराचेही वाहन ऑक्टोबर संपत आला असताना स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत पोहोचलेले नाही. या महिन्यात तब्बल १ लाख ८६ हजार ८२९ लाभार्थ्यांनी धान्याची उचल केलेली नाही. ऑक्टोबरचे धान्य वेळेत न मिळण्याचाही परिणाम जाणवत आहे. आता तर दिवाळी तोंडावर आलेली असताना रेशनचे धान्य गावापर्यंत पोहोचलेले नाही. यामुळे लाभार्थ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील १५३६ रास्त भाव दुकानांतून अंत्योदयचे ६३,१२६ तर प्राधान्यक्रमचे ३ लाख ८८ हजार ६९० लाभार्थी असून एकूण कार्डची संख्या ३ लाख ५१ हजार ८१६ इतकी आहे. यापैकी केवळ २ लाख ६४ हजार ९८७ लाभार्थ्यांनी आतापर्यंत तालुका वितरण बाकी झालेले संग्रामपूर २५२४१ ५५६३ मोताळा २३१९८ ८४२९ नांदुरा २३५१९ १०२१५ ज. जामोद २१४०९ ९५३४ दे. राजा १४२०० ९०११ चिखली २८३०८ १९०७० बुलडाणा २७७५१ २१८९३ लोणार १५८१९ १२६४१ मेहकर २४८४४ २०४४७ खामगाव २४९१० २०८६२ शेगाव १३२९५ ११८८२ मलकापूर १५८१५ १५६२७ सिं. राजा ६६७८ २१६५५.