spot_img

फटाक्यांचा धूर फुप्फुस आणि हृदयासाठी घातक : डॉ. दिपक काटकर 

बुलढाणा, 31 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : शहरातील तथा जिल्ह्याचे सुप्रसिद्ध श्वसन विकार व अलर्जी तज्ञ यांनी सांगितले की फटाक्यांसारख्या प्रदूषकांची भर घालणे परवडणारे नाही. ते तात्पुरते असले तरी त्याचा परिणाम दीर्घकालीन आहे. दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा सण आहे, जो आनंद, प्रकाश, आणि समृद्धीचा प्रतीक आहे. पण या सणानंतर एक मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे हवेचे प्रदूषण. दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात होते, ज्यामुळे हवा प्रदूषित होते. फटाक्यांमध्ये असलेल्या रासायनिक घटकांमुळे जळल्यावर धूर आणि विषारी गॅसांचे उत्सर्जन होते, जे वातावरणात प्रदूषण वाढवते. फटाके फोडल्यामुळे वातावरणात धूर कार्बन-डाय-ऑक्साइड नायट्रोजन डाय-ऑक्साइड आणि सल्फर डाय-ऑक्साइड यांसारखे विषारी घटक वाढतात.

हवेचे प्रदूषण अनेक आरोग्य समस्या निर्माण करू शकते, जसे की श्वसनाच्या समस्या :  अस्थमा(दमा) आजार असलेल्या व्यक्तींसाठी हा धूर फार धोकादायक असतो कारण फटाक्यातून निघालेला धूर जेव्हा त्या व्यक्तीच्या फुफुसामध्ये जातो त्यावेळेस त्याच्या श्वासनलिका आकुंचन व्हायला लागतात आणि एअरवे हायपर रिस्पॉन्सिव्हनेस तयार होऊन छातीमध्ये दाटल्यासारखा वाटते ,खोकला येतो ,श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो .अशा वेळेस काही रुग्णांना भरती करण्याचे सुद्धा गरज भासते .काळा दमा (COPD) असलेल्या व्यक्तीच्या फुफुसाची क्षमता आधीच कमी झालेली असते. अशा रुग्णांना सुद्धा या धुरामुळे त्रास जाणवायला लागतो, दम लागायला लागतो   फुफुसा मध्ये बेडके तयार  व्हायला लागतात. तसेच डोळ्यांची समस्या धुरामुळे डोळ्यांमध्ये जळजळ व्हायला लागते, लालसरपणा जाणवतो आणि ताण येतो. फटाके फोडताना जर बारूद डोळ्यात गेली तर डोळ्यांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही काही व्यक्तींना आयुष्यभरासाठी त डोळ्यां ने दिसणे सुद्धा बंद होऊ शकते. आणि त्वचेवरील समस्या प्रदूषणामुळे  एलर्जी असलेल्या व्यक्तींना त्वचेत खाज, दाने आणि इतर समस्या होऊ शकतात. बारूद मुळे त्वचा जळू (बर्न इजा) सुद्धा  होऊ शकते. इतकेच नव्हे कानाचे आजार फटाक्यांचे आवाज 85 डेसिबल पेक्षा जास्त असू शकतात जे कानाच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. फटाकांच्या आवाजामुळे कान दुखणे, आवाज बंद होणे  कान फुटणे ,चक्कर येणे अशा समस्या उद्भवू शकतात. 

दिवाळीच्या काळात हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी काही उपाय करता येतात

फटाक्यांची आतिषबाजी कमी करणे.

पारंपरिक दिवे, कंदील आणि रंगोली यांचा वापर करून सण साजरा करणे.

फटाके फोडताना कानात प्लग घालावे आणि चष्मा वापरावा .

लहान मुलांना आणि वृद्ध व्यक्तींना प्रदूषणापासून दूर ठेवावे

स्थानिक प्रशासनास सहकार्य करून प्रदूषणविरुद्ध जागरूकता वाढवणे.

या उपायांनी दिवाळीचा आनंद घेता येईल आणि त्याच वेळी हवेचे प्रदूषण कमी करण्यात मदत होईल. एक प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करणे आपल्या आरोग्य आणि पर्यावरणासाठी अत्यंत आवश्यक आहे. अस्थमाच्या रुग्णांनी दिवाळीच्या काळात काही खबरदारी घ्यावी

1. घराबाहेर जाणे शक्यतो टाळावे, विशेषतः फटाके फोडले जात असताना.

2. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा वापर नियमित करावा आणि इनहेलर जवळ ठेवावा.

3. घरामध्ये हवा शुद्ध ठेवण्यासाठी एअर प्युरीफायर वापरावा.

4. सण साजरा करताना फटाक्यांचा वापर टाळावा आणि इको-फ्रेंडली दिवाळी साजरी करावी. या साध्या उपायांनी अस्थमाच्या रुग्णांना दिवाळीचा आनंद घेत असतानाच आपले आरोग्यही सुरक्षित ठेवता येईल.

डॉ.दिपक काटकर , एम.बी.बी.सी एम.डी. श्वसन विकार व अलर्जी तज्ञ काटकर बुलडाणा

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत