बुलढाणा, 4 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) :- उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी मोठ्या उलाढाली होत असतात. अशातूनच कारंजा चौकामध्ये एका जणाकडून वीस लाख रुपयांची कॅश मिळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नाकाबंदी दरम्यान बुलढाणा शहर पोलिसांनी एका स्कुटी चालकाची तपासणी केली असता त्याच्याकडे ही मोठी राशी मिळून आली आहे. स्कुटी चालक आणि कॅश दोघांनाही बुलढाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पकडल्या गेलेल्या व्यक्तीचे नाव जितेंद्र कोचर असून तो अडत व्यापारी असल्याचे समजते. वीस लाख रुपयांची कॅश घेऊन मी चिखली येथे व्यापाराकडे जात होतो, अशी कबुली श्री कोचर यांनी दिली आहे. अर्थात 20 हजार रुपयांच्या वर कुठलीही कॅश कॅरी करण्यास मनाई असल्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी गुड इव्हिनिंग बोलताना सांगितले. सदर प्रकरण निवडणूक विभागाच्या एसएससी पथकाकडे सोपवण्यात आले आहे.