विवाहित मुलींचे नावेही कायम; निवडणूक विभागाचे दुर्लक्ष
बुलढाणा, ५ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) आगामी विधानसभा निवडणुकीतील मतदानाची टक्के वाढ करण्यासाठी निवडणुक आयोगाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. बिएलओच्या माध्यमातुन मतदान यादीचे सर्व कामे केल्या जात असून अनेक विवाहीत मुलींचे लग्न झाल्यानंतर सुध्दा स्थानिक मतदान यादीतील नाव कमी करण्यासाठी पालक स्पष्ट नकार मिळत आहेत. याचा परीणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता निर्माण होईल अशी शक्यता वर्तविल्या जात आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा, तालुका प्रशासणाने बिएल, ओ च्या माध्यमातुन मतदार यादीतील त्रुत्या, नव मतदारांची नोंदणी, मृत मतदारांचे मतदार यादीतील नाव कमी करणे आणि विवाहीत मुलींचे किंवा स्थलांतरी मुलीचे नाव स्थानिक यादी मधुन कमी किंवा विवाह केलेल्या ठिकाणी समाविष्ट करण्याचे काम केल्या जाते. मागील काही महिन्यांपासून बिएल. ओ च्या माध्यमातुन बहुतांश गागा, गावातील मतदार याद्याची छाणणी करीत सदर काम सुरू आहे. परंतु मागील पाच ते सहा वर्षा पासुन विवाह झालेल्या मुलींचे नाव स्थानिक वडीला कडील नाव मतदार यादीतील कमी करण्यास पालकांचा स्पष्ट नकार येत आसल्याचे दिसुन येते. या गंभीर प्रकाराकडे संबंधित निवडणूक अधिकारी यांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
मतदार यादीची पाहणी गरजेची
तालुक्यातील विवाह झालेल्या मुलींची नावे माहेरातून कमी करून सासरी नेण्याची आवश्यकता आहेत. मात्र, अनेक पालक स्थानिक ग्रामपंचायत, जिल्हापरीषद, पंचायत समिती निवडणूका डोळ्या समोर ठेऊन कुटुंबातील विवाहीत मुलीचे माहेरील मत मतदान यादीतील नाव कमी होऊ देत देत नाहीत. नाहीत. ही गंभीर बाब आसुन याकडे आयोगाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
बिएलओंना तुटपुंजे मानधन
तालुक्यातील विवाह झालेल्या मुलींची नावे माहेरातून कमी करुन सासरी नेण्याची आवश्यकता आहेत. मात्र, अनेक पालक स्थानिक ग्रामपंचायत, जिल्हापरीषद, पंचायत समिती निवडणूका डोळ्या समोर ठेऊन कुटुंबातील विवाहीत मुलीचे माहेरील मत मतदान यादीतील नाव कमी होऊ देत देत नाहीत. नाहीत. ही गंभीर बाब आसुन याकडे आयोगाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.