विदर्भातून आ. आशिष जैस्वाल व आ. गायकवाड मंत्रीपदाच्या शर्यतीत
बुलढाणा, २८ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा विधानसभेत सलग दुसऱ्यांदा विजय होण्याचा विक्रम भाजपचे बुलढाणा जिल्हा लोकसभा प्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नावावर होता, आता त्यामध्ये आ. संजय गायकवाड यांच्या सुध्दा नाव ाचा समावेश झाला आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिव सेना उबाठाचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी आक्रोश मोर्चा आयोजीत केला होता. तेव्हा आ. गायकवाड यांच्यावर टिका करतांना शिवसेना उबाठाचे संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी सांगितले होते की, बुलढाण्याची जनता कुणाला तरी एकच वेळ संधी देते. त्यामधील एक अपवाद विजयराज शिंदे यांचा सोडला तर दुसऱ्या कुणाला हे जमले नाही. परंतू आ. संजय गायकवाड यांनी दुसऱ्यांदा विजयी होऊन दाखवले. माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या विरोधात २००४ मध्ये सत्ताधारी आमदार धृपतराव सावळे यांचे तिकीट कापून मुखत्यारसिंग राजपूत यांना काँग्रेसकडून ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली होती. यामध्ये विजयराज शिंदे यांचा विजय झाला होता. त्यानंतर २००९ च्या विधानसभेत ज्या काँग्रेसच्या धृपतराव सावळे यांनी १९९९ मध्ये विजयराज शिंदे यांचा पराभव केला होता. त्याच धृपतराव सावळे यांचा पराभव करत बुलढाणा विधानसभेचे तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व केले. त्याचप्रमाणे सलग दुसऱ्यांदा निवडू येण्याचा विक्रम ही केला होता. २०१९ च्या विधानसभेच्या चौरंगी लढतीत आ. संजय गायकवाड यांनी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार विजयराज शिंदे, भाजप नेते योगेंद्र गोडे यांचा पराभव करत पहिल्यांदा विधानसभा गाठली. २०२४ च्या अटीतटीच्या सामन्यात एखाद्या आयपीएल मॅच सारखी परीस्थिती निर्माण झाली होती. पहिल्या फेरीपा- सून तर शेवटच्या फेरीपर्यंत महाविकास आघाडीच्या उमेदवार अॅड. जयश्रीताई शेळके व आ. संजय गायकवाड यांच्यामध्ये अटतटीची लढत झाली. या लढतीत आ. संजय गायकवाड विजयी झाले. दुसऱ्यांदा निवडून येण्याचा एक विक्रम सुध्दा आ. संजय गायकवाड नावावर झाला आहे. विदर्भात शिंदे गटाच्या आमदारांमध्ये आ. संजय गायकवाड हे एकनाथराव शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून समजले जात असल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांना मंत्रीपद मिळण्याची आशा आहे. राज्यातील मंत्रीमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे संजय राठोड यांच्या ऐवजी रामटेकचे पाच टर्मचे आमदार आशिष जैस्वाल किंवा आ. संजय गायकवाड यांना संधी मिळू शकते.