बुलढाणा, 10 डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : चिखली पोलिस स्टेशन येथे मोटारसायकल चोरल्या प्रकरणी तक्रार दाखल झाली होती. सवणा येथून चोरी गेलेली गाडी ही पोलासाची होती. या चोरीत तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे. यामधील एक अल्पवयीन आहे. 23 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता ते सकाळी 6 वाजता दरम्यान सवणा ता. चिखली जि. बुलढाणा येथून चोरी झालेल्या मोटारसायकलचे आरोपी CCTV फूटेज व तांत्रिक विश्लेषनाचे आधारे व गोपनीय माहिती मार्फत आरोपी पवन गजानन शिंदे वय 21 वर्ष रा. भादोला ता. जि. बुलढाणा, श्याम विजय धंदर वय 23 वर्ष रां.वरवड ता. जि. बुलढाणा व एक अल्पवयीन यांच्याकडून चोरी गेलेली होंडा युनिकॉर्न मोटारसायकल क्रमांक MH 28 BZ 7652 छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी येथून ताब्यात घेतली आहे. सदरची कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखाली दिपक लेकुरवाळे पोहेको चांद शेख, पोहेको अनुप मेहेर, पोहेको राजू आढव, पोको ऋषिकेश खंडारे, पोको भरत जाधव, पोको हेलगे यांनी पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.