■ बुलढाण्यात लागले बांगलादेश मुर्दाबादचे नारे ■
बुलढाणा, १० डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदू समुदायासह इतरांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात बुलढाण्यात निषेध करण्यात आला. बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज बुलडाणा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश न्याय मोर्चा काढण्यात आला गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत. दररोज बलात्कार, खून, लुटमार, जा ळपोळीच्या घटना घडत आहेत. या घटना निंदनीय असून मानवजातीला काळीमा फासणाऱ्या आहेत. केवळ हिंदू आहेत म्हणून हा अत्याचार होत आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत असून या घटनेचा निषेध नोंदणीसाठी आज १० डिसेंबरला बुलढाणा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक गर्दै वाचनालय येथून हा मोर्चा शहरातील विविध मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला या मोर्चातील एका शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले या मोर्चामध्ये आ.डॉ. संजय कुटे, आ. चैनसुख संचेती, आ. अॅड. आकाश फुंडकर, माजी आमदार विजयराज शिंदे, सचिन देशमुख, मृत्यूंजय गायकवाड, ओमसिंग राजपूत, विनायक भाग्यवंत, साधूमंहत यांच्यासह विविध पक्षांचे व संघटनांचे तसेच हिंदू समाजातील युवक महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.