spot_img

धीरेंद्र कृष्ण शास्त्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक

बुलढाणा, 29 डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) :- बागेश्वर धाम पिठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी शेगाव येथे संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. केवळ एका तासापुरता त्यांचा हा दर्शन दौरा होता. गुड इव्हिनिंग सिटीला विश्‍वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, बागेश्वर धाम सरकार शेगावात येणार ही बातमी सर्वप्रथम गुड इव्हिनिंग सिटीने आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवली होती. श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन संस्थांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा आणि विविध उपक्रमांची माहिती घेतली हा उद्देश धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा होता. जळगाव खांदेशच्या एअरपोर्ट वरून बागेश्वर धाम सरकारचे हेलिकॉप्टर शेगावमध्ये पोहचले. माऊली इंजिनिअरिंग कॉलेजच्या परिसरामध्ये हेलीपॅड ची व्यवस्था करण्यात आली होती. धीरेंद्र शास्त्री महाराज दुपारी 3 वाजता शेगावात दाखल झाले होते. खराब हवामानामुळे   त्यांना शेगावात दाखल होण्यास विलंब लागला. त्यांनी संत गजानन महाराज यांचे दर्शन घेत शेगाव संस्थान विषयी माहिती जाणून घेतली. यावेळी संत गजानन महाराज संस्थानचे विश्‍वस्त यांनी त्यांना संस्थान विषयी माहिती दिली. संभाव्य गर्दी लक्षात घेता जिल्हा पोलीस प्रशासनाने दौरा स्थळ मार्गावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गडा गावात असलेले बागेश्वर धाम हे स्वयंभू हनुमानजींच्या देवत्वासाठी देश-विदेशात प्रसिद्ध आहे. बागेश्वर धाम ही अनेक तपस्वींची दैवी भूमी आहे, जिथे नुसते दर्शन घेऊन लोकांना बालाजी महाराजांचे आशीर्वाद मिळतात. येथे बालाजी महाराज एका अर्जाद्वारे तुमची समस्या ऐकतात आणि धामचे पीठाधीश्वर, पूज्य धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी महाराज, ज्यांना जग बागेश्वर धाम सरकार या नावाने संबोधते, त्यांच्यामार्फत ते समस्यांचे समाधान मिळवतात.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत