जिल्हाधिकारी यांच्या अख्त्यारितील आणखी सुट्ट्या कोणत्या??
बुलढाणा, २ जानेवारी ( गुड इव्हिनिंग सिटी) : गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त शासकीय यावर्षी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. विदर्भाची पंढरी म्हणून शेगावला ओळखल्या जाते. राज्यभर संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. शेगाव येथे प्रकट दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. शेगाव संस्थांन आपल्या सामाजिक कार्य आणि शिस्तबद्ध नियोजन यासाठी देशभर प्रसिद्ध आहे. संत गजानन महाराज प्रकट दिन २० फेब्रुवारी २०२५ रोजी संपुर्ण बुलढाणा जिल्ह्यात शासकीय सुट्टी घोषित करण्यात आली आहे. तसेच अक्षय तृतीया ३० एप्रिल २०२५, जेष्ठगौरी पुजन १ सप्टेंबर २०२५ या दिवशी सुट्ट्या जाहीर करण्यात आलशल्या आहे. बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी आज २ जानेवारी रोजी यासंदर्भातला आदेश पारित केला आहे.