बुलढाणा, 3 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) :- सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. आज 3 जानेवारी रोजी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या फेसबुक पेजचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी सर्वप्रथम सावित्रीमाई फुले पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बीसीसीएन चे संपादक सुधाकर आहेर यांच्या हस्ते फीत कापून बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या फेसबुक पेजचे अनावरण करण्यात आले. जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी फेसबुक पेजचे महत्व विशद करतांना सांगितले की, प्रत्येक पत्रकाराला या फेसबुक पेजच्या माध्यमातून एकसंघ राहण्यास मदत होईल. त्याच प्रमाणे सोशल मिडीयाच्या या युगात या फेसबुक पेजव्दारे पत्रकारांपर्यंत पोहचणे सहज शक्य होणार आहे. यावेळी सुधाकर आहेर यांनी सवित्रीमाई फुले यांना अभिवादन करत नवनिर्वाचीत जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारणीचे अभिनंदन करत म्हणाले की, बदलत्या काळानुरूप बदल झाला पाहीजे त्याप्रमाणे जिल्हा पत्रकार संघाने सर्व पत्रकारांना आपल्याशी जुळवून ठेवण्यासाठी फेसबुक पेजचा मार्ग निवडला त्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. याला भरभरून प्रतिसाद मिळेल असा आशावाद व्यक्त केला. यावेळी जिल्हा पत्रकारसंघाचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत तसेच विभागीय शासकीय अधिस्विकृती समितीचे सदस्य राजेंद्र काळे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, सरचिटणीस कासिम शेख, कार्याध्यक्ष वसिम शेख, महिला सेल अध्यक्ष कु. मृणाल सोमनाथ सावळे, सहसचिव शिवाजी मामनकर, पत्रकार सर्वश्री युवराज वाघ, रविकिरण टाकळकर,विलास खंडेराव, पवन सोनारे,शेख इद्रिस, शाकीर हुसैन, अजय काकडे, मुकेश मोरे, तुषार यंगड, शंकर राजगुरू, रमेश जाधव यांची उपस्थिती होती.