spot_img

चाकुचा धाक दाखवुन पैसे लुटणारा “डुबल्या” अन् त्याच्या साथीदाराला कैद

बुलढाणा, 5 जानेवारी  (गुड इव्हिनिंग सिटी) :-  चाकुचा धाक दाखवुन पैसे लुटणारे अट्टल गुन्हेगार चिखली पोलीसांकडून अटक केले आहे. पोलीस स्टेशन चिखली येथे सुनिल सखारामअप्पा जिरवनकर, हॉटेल राज वाईन बार मालक रा. गांधीनगर चिखली यांनी तक्रार दिली की,3 जानेवारी  रोजी रात्री 08.30 वाजताचे सुमारास ते राज वाईन बार हॉटेलचे काउंटरवर बसलेले असतांना आरोपी सै.समिर सै.जहीर व विशाल राजेश दांडगे ऊर्फ डुबल्या दोन्ही रा. गौरक्षणवाडी चिखली असे हातात चाकु घेऊन हॉटेलमध्ये घुसले व आरोपी सै.समीर याने फिर्यादीच्या गळ्याला चाकु लाऊन आरडा ओरड करशील तर चाकु खुपसून देईल अशी धमकी देऊन गल्ल्याजवळ घेऊन गेला व गल्ल्यातील 1 हजार 100 जबरीने काढुन घेतले तसेच आरोपी विशाल याने फिर्यादीच्या खिशात हात घालुन खिशातील 900 रुपये जबरीने काढून घेतले व पोलीसात तक्रार केल्यास जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देऊन तेथुन पळून गेले. सदरची तक्रार प्राप्त होताच नमुद दोन्ही आरोपी विरुध्द गु. र. नं. 06/2025 कलम 309 (4), 351 (2). 3 (5) BNs प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.
नमुद आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे असल्याने व त्यांची दहशत वाढत असल्याने त्यांना अटक करणे आवश्यक होते. त्यानुसार चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी तपास पथक तयार करुन आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्यात अटक करण्याच्या सुचना दिल्या, तपास पथकाने आज दि. 4 जानेवारी रोजी आरोपींबाबत माहीती काढली असता ते गोरक्षणवाडी येथे लपुन असल्याची माहीती मिळाली, सदर माहीतीवरुन पथकाने त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक केले असुन त्याच्याकडुन गुन्ह्यात वापरलेला चाकु व जबरीने चोरुन नेलेले 2 हजार रूपये जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपींना न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची बुलडाणा जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे.
सदरची कार्यवाही  पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या नेतृत्त्वात पोउपनि परमेश्वर केंद्रे, शरद भागवतकर, प्र. पोउपनि समधान बडणे, संतोष जाधव, पोलीस अंमलदार राजेंद्र काळे, प्रशांत धंदर, पंढरी मिसाळ विजय किटे, अमोल गवई, गजानन काकड, सागर कोल्हे, निलेश सावळे यांनी केली आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत