बुलढाणा, 5 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) :- शाहीरीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आत्मभान जागृत करणार्या शाहीरांमध्ये अग्रगण्य नांव म्हणजे स्वातंत्र्यशाहीर बाबूसिंह राजपूत यांच्या 38 व्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रिसिध्द स्टार प्रवार फेम युवाशाहीर अविष्कार देशिंगे यांचा शाहिरीचा अवष्किार हा वीररसपूर्ण आणि पोवड्यांचा बहारदार कार्यक्रम दिनांक 6 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता गोवर्धन हॉल, बुलढाणा अर्बन समोर कारंजा चौक बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, प्रमुख अतिथी आमदार संजय गायकवाड, विशेष उपस्थिती म्हणून माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर संस्थापक अध्यक्ष क्रांतीकारी शेतकरी संघटना, विजय अंभोरे युथ वेल्फेयर असो. बुलढाणा यांची उपस्थिती असणार आहे. तरी या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अजयसिंग राजपूत, सज्जनसिंग राजपूत व शाहीर बाबुसिंग राजपूत कलामंचाच्या वतीने करण्यात आले आहे.