बुलढाणा, 7 जानेवारी (प्रतिनिधी) :- पत्रकार संघटनांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषेशी संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचा विस्तार सुरु असून ज्येष्ठ पत्रकार राजेश डिडोळकर यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या जिल्हा समन्वयकपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. जिल्हा पत्रकार भवनमध्ये बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत साप्ताहिक ज्ञानवर्धिनीचे संपादक तथा ‘द हितवाद’ चे जिल्हाप्रतिनिधी राजेश डिडोळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अनुभवी आणि अभ्यासक पत्रकार म्हणून नावलौकिक असलेले राजेश डिडोळकर आता पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या जिल्हा समन्वयकपद भूषविणार आहेत. याप्रसंगी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष वसीम शेख, सचिव कासिम शेख, सहसचिव शिवाजी मामनकर तसेच जितेंद्र कायस्थ, इसरार देशमुख, अजय राजगुरे, प्रकाश जेऊघाले यांची उपस्थिती होती. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांनी जिल्हा समन्वयक श्री डिडोळकर यांचे स्वागत केले. सन 1989 पासून मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये पत्रकारिता करणारे राजेश डिडोळकर यांचा जिल्हाभर नावलौकिक आहे.